Home चंद्रपुर जिल्हा विशेष वनपरिक्षेत्रातून अवैद्य उत्खनन करणार ट्रॅक्टर पकडला

वनपरिक्षेत्रातून अवैद्य उत्खनन करणार ट्रॅक्टर पकडला

1114

भद्रावती वनविभागाची कारवाई

भद्रावती : भद्रावती (चिचोर्डी) वनपरिक्षेत्राच्या नियोजित क्षेत्रात अवैधरित्या वाळूचे उत्खनन व वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळताच वनविभागाने टाकलेल्या छाप्यात वाळूने भरलेला ट्रॅक्टर जप्त करण्यात आला. ही कारवाई ४ फेब्रुवारी रोजी सकाळी 6.30 च्या सुमारास करण्यात आली.

.     चंद्रपूर विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे व सहाय्यक वन संरक्षक विकास तरसे यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रावती वनपरिक्षेत्र अधिकारी के.डब्लू.धानकुटे यांच्या नेतृत्वाखाली गस्त घालत असताना महिंद्रा ट्रॅक्टर क्रमांक एमएच.३४-एल-७९४४ व ट्रॉली एमएच-२९-५८७० सह भद्रावती निवासी संगत सिंह यांच्या मालकीचे मौजा चिचोर्डी येथील नाल्यातून बेकायदेशीररीत्या वाळू उत्खनन व वाहतूक करताना दिसून आले. चालकाकडून वाळू वाहतुकीचा परवाना मागितला असता त्याच्याकडे आढळून आला नाही. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ट्रॅक्टर मालक आणि चालक संगत सिंग यांच्यावर कारवाई करत ट्रॅक्टर जप्त केला.

.   या कारवाईत क्षेत्र सहाय्यक व्ही.व्ही.शिंदे, वनरक्षक डी.एम.गेडाम व वन कर्मचारी पवन मांढरे, नितीन राऊत, अनिल शेंद्रे, अमर किन्नाके, किशोर मडावी यांनी ही कारवाई यशस्वीपणे राबवली.

error: Content is protected !!