दोषींवर देशद्रोहाचा खटला दाखल करून नागरिकत्व रद्द करा
चंद्रपूर : अमृतसर येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करत भारतीय संविधानाची प्रत जाळल्याने पुरोगामी संघटनांनी सोमवारी (दि. ३) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. या घटनेने जागतिक पातळीवर भारताची प्रतिमा मलिन होत असल्याने अशा प्रवृत्तीच्या गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी कायदेमंडळाद्वारे कठोर कायदा करावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली.
. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याच्या घटना वाढत आहेत. ही घटना अत्यंत गंभीर असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी प्रकरणातील दोषींवर देशद्रोहाचा खटला दाखल करून नागरिकत्व रद्द करून कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध सभेतून केले.
. यावेळी समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, रिपब्लिकन पक्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर जयंती महोत्सव समिती व जिल्ह्यातील बौद्ध विहार कमिटी, आंबेडकरी चळवळीचे प्रतिनिधी, ज्येष्ठ नेते प्रवीण खोब्रागडे, अशोक निमगडे, विशाल लोने, अशोक टेंभरे, किशोर सवाणे, राजू खोब्रागडे, सुरेश नारनवरे, महादेव कांबळे, शंकर वेलहेकर, राजकुमार जवादे, अॅड. राजस खोब्रागडे, बुद्धप्रकाश वाघमारे, राजेश वनकर, विजय करमरकर, सुशील बुजाडे, वामन चांद्रिकापुरे, चेतन पाटील, विद्याधर लाडे, मुन्ना खोब्रागडे, प्रमोद मून, बाजीराव उंदिरवाडे, सिद्धार्थ सुमन, संतोष रामटेके, मृणाल कांबळे आदी उपस्थित होते.


