Home चंद्रपुर जिल्हा विशेष गडबोरीतील कोलासुर मंदिरावर बिबट्याचे बस्थान

गडबोरीतील कोलासुर मंदिरावर बिबट्याचे बस्थान

1119

वनविभागाने वेळीच लक्ष घालण्याची मागणी

सिंदेवाही : गडबोरी येथे मागील १५ ते २० दिवसापासून बिबट्याचा कहर सुरू आहे. अनेकांच्या कोंबड्या, बकऱ्या ठार करून सायंकाळी सहा वाजता गावाशेजारी बिबट्या आरडाओरड करीत असल्याने गावकऱ्यांत प्रचंड भीती निर्माण झाली असताना रविवारी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान गावालगत असलेल्या कोलासूर मंदिराचे छतावर बिबट्या बसला असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी बघितले. काहींनी त्याला मोबाईल मध्ये कैद केले. यामुळे आता गावकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करावा. अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

.       सिंदेवाही वनपरिक्षेत्र अंतर्गत नवरगाव उपवन क्षेत्रातील गडबोरी येथे गावालगत असलेल्या पहाडीवर मागील पंधरा ते वीस दिवसापासून बिबट्याचा धुमाकूळ सुरू असून आता पर्यंत त्याने गावातील शेकडो कोंबड्या, बकऱ्याना फस्त केले आहे. रविवारी सायंकाळी पाच वाजताचे दरम्यान गावालगत असलेल्या कोलासूर मंदिराच्या छतावर बिबट्याचे बस्तान असल्याचे दिसून आले. त्यामुळे बघ्यांची एकच गर्दी उसळली होती. काहींनी आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात बिबट्याला कैद केले. बिबट्या दररोज सायंकाळी पाच ते सहाचे दरम्यान गावालगत येऊन आरडाओरड करीत असल्याने गावकरी घराच्या बाहेर निघणे दुरापास्त झाले आहे. सायंकाळी ७ वाजता पासून गावात संचारबंदी सुरू असल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. मात्र वनविभाग केवळ बघ्यांची भूमिका घेत असून इको डेव्हलप मेंट समितीच्या माध्यमातून फटाके फोडण्याचे काम सुरू असल्याचे माहिती प्राप्त झाली आहे. बिबट्या जरी मोठ्या प्राण्याची शिकार करीत नसला, तरी गावातील कोणत्याही व्यक्तींना बिबट्या पासून धोका होऊ शकते. त्यामुळे वनविभागाने वेळीच या गंभीर प्रकाराकडे लक्ष घालून बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करावा. अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

error: Content is protected !!