Home चंद्रपुर जिल्हा विशेष वरोरा शहरातील सार्वजनिक मुत्रीघर गेले चोरीची

वरोरा शहरातील सार्वजनिक मुत्रीघर गेले चोरीची

1104

सामाजिक कार्यकर्त्यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

वरोरा : नगर पालिकेच्या वतीने शहरातील अनेक ठिकाणी सार्वजनिक मुत्रीघरे बांधली मात्र काही मुत्रीघरे कागदावर तर काही गायबच झाल्याने या मुत्रीघरांची चोरी झाल्याचा आरोप करण्यात येत असल्याने युवा सेनेचे चंद्रपूर जिल्हाप्रमुख मनीष जेठाणी यांच्या नेतृत्वात वरोरा येथील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी ‌नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्याकडे निवेदन दिले. यात त्यांनी चोरी झालेल्या मुत्रीघरांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.

.    वरोरा शहरातील बाजारपेठेत सार्वजनिक मुत्री घरांची वाणवा आहे. यामुळे बाजारपेठेत येणाऱ्या पुरुष व महिलांना याचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. गांधी उद्यानासमोरील तलावालगत नगर परिषदेच्या मालकीचे मुत्रीघर होते परंतु काही वर्षांपासून या ठिकाणची मुत्री घरे गायब झाले असून तिथे व्यावसायिकांनी आपले व्यवसाय उभे केले असल्याचे दिसून येते. मित्र चौकात असलेल्या मुत्रीघराचेही हे चित्र आहे. कामगार चौकातील मुत्रीघराची साफ सफाई होत नसल्याने परिसरातील व्यवसायिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. शहरातील सर्वे नंबर १७९ मध्ये २८.१९ चौ.मी. जागेवर सार्वजनिक शौचालय व मुत्रीकर उभारण्यात आले होते त्याचेही अस्तित्व संपले आहे. यासोबतच शहरातील अन्य ठिकाणी असलेल्या नगर परिषदेच्या शौचालय व मुत्रीघरांच्या जागेची हीच अवस्था आहे.

.       यासंदर्भातील वृत्त विविध वृत्तपत्रात प्रकाशित होताना सदर मुत्रीघरांची चोरी झाल्याचा आरोप केला होता. याची दखल घेत युवा सेनेचे चंद्रपूर जिल्हा प्रमुख मनीष जेठाणी यांनी घेत याविरुद्ध मुख्याधिकाऱ्याकडे निवेदन देऊन चोरी झालेल्या मुत्रीघरांची चौकशी आणि दोषींवर कारवाई करावी, सदर जागा लिजवर देण्यात आली असल्यास या संदर्भात माहिती देऊन यासाठी दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे. निवेदन सादर करताना राम जुनघरे,नितेश जयस्वाल, मनोज कोहळे, प्रवीण सुराणा,राजू जाजूर्ले,जयंत मारोडकर उपस्थित होते.

error: Content is protected !!