राज्य स्तरीय आदर्श शिक्षक प्राचार्या स्मिता चिताडे यांची स्वच्छता दुत म्हणून निवड

33

गडचांदूर

महात्मा गांधी विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय, गडचांदूर येथील राज्य स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापिका तथा प्राचार्या स्मिता अनिल चिताडे यांचा नगर परिषद, गडचांदूर च्या वतीने 21 सप्टेंबर ला नगराध्यक्षा सविता टेकाम यांच्या हस्ते शाल,श्रीफळ, व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला, तसेच स्वच्छता अभियान अंतर्गत नगर परिषद च्या स्वच्छता दुत म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली.

याप्रसंगी नगर परिषद चे उपाध्यक्ष शरद जोगी, गटनेते तथा सभापती विक्रम येरणे, नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी, व कर्मचारी उपस्थित होते, प्राचार्या स्मिता चिताडे यांनी नियुक्ती केल्या बद्दल नगर परिषद चे आभार मानले असून नगर परिषद व ग्रामस्थांच्या सहकार्य ने स्वच्छ व सुंदर गडचांदूर शहर बनविण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची ग्वाही दिली आहे, प्राचार्या स्मिता चिताडे यांच्या नियुक्ती चे सर्व स्तरातून अभिनंदन केले जाते आहे,