Home चंद्रपुर जिल्हा विशेष परीक्षार्थी विद्यार्थी आक्रमक : जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

परीक्षार्थी विद्यार्थी आक्रमक : जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

1129

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची नोकरभरती रद्द करा

चंद्रपूर : ऑनलाइन परीक्षेत अनियमितता झाल्यामुळे नोकरभरती रद्द करण्यात यावी. या  नोकरभरती विरोधात आता परीक्षार्थी विद्यार्थी आक्रमक झाले आहे. तर आरक्षण बचाव संघर्ष समितीचे मनोज पोतराजे यांचे उपोषण सुरूच आहे. गेल्या सात दिवसांपासून उपोषणावर असल्यामुळे पोतराजे यांची प्रकृती खालावली आहे. नोकरभरती विरोधात गुरुवारी  आरक्षण बचाव संघर्ष कृती समिती व  परीक्षार्थी विद्यार्थी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.

.       सिडीसीसी बँक ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत आरक्षण बचाव संघर्ष कृती समिती सदस्य व विद्यार्थी यांनी भव्य मोर्चा काढला. यावेळी राजू कुकडे यांनी बँक व्यवस्थापनावर थेट आरोप लावत प्रत्येक जागेसाठी 25 ते 40 लाख रुपये घेतल्याचा आरोप लावला. परीक्षेत आलेल्या प्रश्नांचे योग्य पर्याय निवडत त्याचे पर्याय शेवटी बदलले, परीक्षा केंद्रावर गडबडी करण्यात आली. त्यामुळे नोकरभरती प्रकरण रद्द करण्यात यावी. यासह अनेक मागण्यांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.

काय म्हणाले आमदार मुनगंटीवार                                                                                                                                              माजी मंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी उपोषण मंडपाला भेट गुरवारी भेट दिली. उपोषणकर्ते मनोज पोतराजे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. या दरम्यान आमदार मुनगंटीवार म्हणाले की नोकरीचा अधिकार हा सर्वांचा आहे, आरक्षणानुसार हा अधिकार सर्व प्रवर्गाना भेटायला हवा मात्र देशात पहिल्यांदाचं चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने आरक्षण संपविण्याचे कृत्य केले आहे. जर उपोषण कर्त्यांच्या  जिवाचं काही बरं वाईट झालं तर त्याला प्रशासन व सहकार विभाग पूर्णतः जबाबदार राहणार.

 

error: Content is protected !!