Home सामाजिक विसापुरात संत तुकाराम महाराज यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक

विसापुरात संत तुकाराम महाराज यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक

1440

सकल कुणबी समाजाचे आयोजन 

बैलगाडीच्या माध्यमातून देखाव्याचे सादरीकरण

बल्लारपूर : जगतगुरू संत तुकाराम महाराज यांच्या जयंतीनिमित्त सकल कुणबी समाजातर्फे मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीचे आकर्षण म्हणजे तीन बैलगाडीतून देखाव्याचे सादरीकरण ठरले. एका वाहनावर संत तुकाराम महाराज यांची प्रतिमेची मिरवणुकीत सहभाग होता. दरम्यान महिला भजन मंडळाने भजनातून संतांच्या कार्याचा संदेश दिला.

.      बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील सकल कुणबी समाजाचे सभागृह येथून मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आले. ही मिरवणूक मुख्य मार्गांनी निघालेल्या समाज बांधवांनी गावातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांना मालार्पण करून अभिवादन केले. यावेळी सकल कुणबी समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची तथा समाज बांधवांची मोठी उपस्थिती होती.

error: Content is protected !!