Home सामाजिक अमरावतीत महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था गट सचिव कर्मचारी संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन

अमरावतीत महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था गट सचिव कर्मचारी संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन

1165

दि. 18  जाने ला अमरावती गुंजनार जय सहकार

नेरी : महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था गट सचिव कर्मचारी संघटनेचे 4 थे राज्य अधिवेशन व चर्चासत्र शनिवार दि.18 जानेवारी ला संत गाडगे महाराज समाधी मंदिर ट्रस्ट, अमरावती येथे आयोजित करण्यात आला आहे.

.       या अधिवेशनाला राज्यातील अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार असून राज्यातील गटसचिव कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या, प्रश्न आणि इतर अनेक मुद्यावर खुले चर्चासत्र होणार असून अनेक ठराव पारीत होणार आहेत. तेव्हा संघटनेच्या सदस्यांनी मोठया संख्येने उपस्थित राहून अधिवेशनात सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केला आहे.

.       या राज्य अधिवेशनाला अधिवेशनाचे उद्घाटक म्हणून सहकारी संस्था अमरावती विभागीय सहनिबंधक प्रविण फडणवीस, अध्यक्ष म्हणून म. रा. सह. स. गटसाचिव कर्मचारी संघटना अध्यक्ष भगीरथ माकडे उपस्थित राहणार आहे तर प्रमुख अतिथी म्हणून सहकारी संस्था अमरावती जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभार, अखिल भारतीय मजदुर संघ उपाध्यक्ष निता चोबे, राष्ट्रीय सहकारी पॅक्स कर्मचारी संघ (भारत) अध्यक्ष राजेशकुमार गुप्ता, सहकारी संस्था अमरावती सहाय्यक निबंधक सचीन पतंगे, अखिल भारतीय मजदुर संघ कार्य समिती सदस्य शिल्प देशपांडे, भारतीय मजदुर संघ विदर्भ प्रदेश नागपूर उपाध्यक्ष राजेंद्र दौड, भारतीय मजदुर संघ अमरावती जिल्हाध्यक्ष हेमंत मस्करे, जिल्हा कोषाध्यक्ष रुपेश राऊत, भारतीय मजदुर संघ जिल्हामंत्री सतेंद्र कुसरे, सरचिटणीस रविंद्र काळे, राज्य संस्था नियुक्त सचिव कृति समिती अध्यक्ष विजय वांजे, संस्था नियुक्त सचिव कृति समिती राज्य समन्वयक सचिन भोसले, राज्य संस्था नियुक्त सचिव कृती समिती सदस्य / सल्लागार  जयहनुमान घाडगे आदी मान्यवर उपस्थिती राहणार आहेत.

.      सदर अधिवेशनात चर्चासत्रचे माध्यमातून गट्सचीवांचे मार्गी लागलेले प्रश्न तसेच अजूनही काही प्रश्न प्रलंबित राहिलेले प्रश्न सोडविण्यासाठी शासन दरबारी आवाज उठविण्यासाठी सहकारी संस्थेतील सर्व  कर्मचाऱ्यांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. या अधिवेशना राज्यातील सर्व गट सचिव कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून सहभागी व्हावे असे आवाहन राज्य संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच पदाधिकारी व चंद्रपूर जिल्हा संघटनेचे पदाधिकारी व सदस्य सचिवांनी  केले आहे.

error: Content is protected !!