Home सामाजिक प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचे २ लाख रुपये वारसदारांना सुपूर्द

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचे २ लाख रुपये वारसदारांना सुपूर्द

1173

फक्त 436 रुपयांत 2 लाखांचे विमा संरक्षण !

विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा चंदनखेडा च्या खातेदाराला खात्यात जमा

भद्रावती : कधी कोणाला काय होईल आणि कोण कधी सोडून जाईल याची काही शाश्वती नाही. त्यामुळे आपल्या कुटुंबाची भविष्यासाठी आर्थिक तरतूद करणे आवश्यक झाले आहे. चंदनखेडा येथील एका युवकाच्या वारसदाराला केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ मिळाल्याने विमाधारकाच्या वारसदाराला विदर्भ कोंकण ग्रामीण बँक शाखा चंदनखेडा च्या खातेदाराला 2 लाख रुपये विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक यांनी खात्यात केली.

.         विदर्भ कोंकण ग्रामीण बँक शाखा चंदनखेडा येथील महिला कलावती परसराम कुळमेथे या महिलेने केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा 436 रूपयांचा विमा काढला होता. हृदय विकाराच्या झटक्याने 17 आक्टोबर 2024 ला कलावती परसराम कुळमेथे या महिलेचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पतीने विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेच्या व्यवस्थापकाला माहिती दिली. कलावती ह्या महिलेने मृत्युच्या अगोदर विदर्भ कोंकण ग्रामीण शाखा चंदनखेडा येथे काढलेल्या विम्याची बँके कडून कागदपत्राची पूर्तता करण्यात आली. आणि बँकेच्या प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना अंतर्गत मृत्यकाच्या वारसदार त्यांचे पती परसराम भाऊराव कुळमेथे यांना 30 डिसेंबर 2024 ला शाखा व्यवस्थापक यांनी 2 लाख रुपये खात्यात जमा करण्यात आली.

error: Content is protected !!