Home चंद्रपुर जिल्हा विशेष वाघाच्या हल्ल्यात मजूर ठार

वाघाच्या हल्ल्यात मजूर ठार

1151

बल्लारपूर वन परिक्षेत्रातील घटना

वन विभागाने नरभक्षी वाघाला केले जेरबंद

बल्लारपूर : बल्लारशाह वन परिक्षेत्रात बांबू निष्कासन करणाऱ्या एका मजूरावर दबा धरुन असलेल्या वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात मजूर घटनास्थळीच ठार झाला. ही घटना मंगळवार सकाळी १0 वाजता बल्लारपूर वन परिक्षेत्रातील युनिट क्रमांक ५ मध्ये वनखंड ४९3 मध्ये घडली. वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या मजूराचे नाव लालसिंग बरेलाल मडावी (५७) रा. मनिकपूर माल (बेहरटोला) जिल्हा मंडला मध्यप्रदेश असे आहे.

.       चंद्रपूर येथील नगीन पुगलिया या बांबू कंत्राटदाराने बल्लारशाह वन विभागातील राखीव वन खंड ४९3 मधील युनिट क्रमांक ५ मध्ये बांबू निष्कासनाचे काम घेतले होते. या कामावर लालसिंग बरेलाल मडावी होता. तो जंगलात बांबू निष्कासन करण्याचे काम करत होता. ध्यानीमनी नसताना दबा धरुन असलेल्या वाघाने त्याचेवर हल्ला केला. या हल्ल्यात मजूर जागीच ठार झाला. या घटनेची माहिती वन विभागाला दिली.

.      वन विभागाच्यावतीने घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी वन विभागाच्या पथकाला जबर धक्का बसला. मजूराला ठार करून वाघ शेजारी बसला असल्याचे आढळून आले. तेथून वन विभागाच्या पथकाने वाघाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र नरभक्षी वाघाने बस्तान सोडले नाही.दरम्यान पशु वैद्यकीय अधिकारी तथा वन्यजीव उपचार केंद्र,ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर चे डॉ. कुदंन पोडचलवार व शुटर अविनाश फुलझेले यांना घटनास्थळी पाचारण केले. त्यांनी पाच तासाच्या प्रयत्नातून बेशुद्ध करण्याची लस टोचून नरभक्षी वाघाला मोठ्या शिताफीने जेरबंद करण्यात यश मिळवले.

.     ही कारवाई मध्य चांदा वन विभागाच्या उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू यांच्या मार्गदर्शनात व राजुरा येथील उपविभागीय वन अधिकारी पवनकुमार जोंग यांच्या नेतृत्वात सहाय्यक वनसंरक्षक आदेशकुमार शेंडगे, बल्लारपूर चे वन परिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे, क्षेत्र सहाय्यक के.एन.घुगलोत, व्ही. पी.रामटेके, वनरक्षक सुधीर बोकडे, अनिल चौधरी, धर्मेंद्र मेश्राम, सुरेंद्र देशमुख, वर्षा पिपरे, उषा घोडवे यांच्या पथकाने केली.

error: Content is protected !!