आरोपी अटकेत
चिमूर : चॉकलेटचे आमिष दाखवून पहिल्या वर्गात शिकणाऱ्या एका चाळीस वर्षे नराधमाने अतिप्रसंग केल्याची घटना रविवारी चिमूर तालुक्यातील भिसी येथे घडली. घटनेची माहिती होताच गावकऱ्यांनी पोलिसात धाव घेत पोलीस स्टेशन परिसरात गर्दी केली होती दरम्यान त्या नराधम आरोपीला पोलिसांनी तात्काळ अटक केली. अरविंद हरिदास नगराळे (४०) रा. भिसी असे आरोपीचे नाव आहे.
. प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील भीसी येथील आरोपी अरविंद नगराळे याने दुपारच्या सुमारास बाजार चौकातील एका पडक्या घरात मुलीला चॉकलेट देतो म्हणून नेले आणि तिथे तिच्यावर अतिप्रसंग केला. घटना नागरिकांना माहीत होताच पोलीस स्टेशन गाठले. आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली. दरम्यान काही क्षणातच आरोपीला अटक करीत जमावाला पोलीस प्रशासनाने शांत केले. भाजप नेते डॉ. दिलीप शिवरकर, स्वप्नील गाडीवार, रवींद्र लोहकरे, निलेश गभने, काँग्रेसचे अरविंद रेवतकर, सचिन गाडीवार यांनी ठाणेदारांची भेट घेत कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
. मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून सदर आरोपी विरुद्ध कलम ६४, ६४(२), (आय), ६२(२), बीएनएस सहकलम ४, ८ पास्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली. पुढील तपास ठाणेदार जितेंद्र चांदे करीत आहेत.


