Home सामाजिक राष्ट्रसंताच्या भजनाने रंगली तपोभूमी

राष्ट्रसंताच्या भजनाने रंगली तपोभूमी

1149

नेरी : विदर्भाची पंढरी समजली जाणारी आणि वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तपोभूमीत गुंफा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या दरम्यान भजन संध्येच्या भजनांनी आणि ग्रामगितेचे पाठांतर स्पर्धेच्या अध्यायांनी संपुर्ण तपोभूमी भजनात रंगली होती.

.      तपोभूमी येथे मोठ्या उत्साहात गुंफा यात्रा महोत्सवाला सुरवात झाली. राष्ट्रसंताना अभिवादन करण्यासाठी हजारो गुरुदेव भक्त भाविक हजेरी लावीत आहेत दि 10 जाने भजन संध्या ग्रामगीता पाठांतर स्पर्धा मोट्या उत्साहात संपन्न होत असून अनेक भजन मंडळांनी आणि अनेक भाविकांनी ग्रामगीता पाठांतर स्पर्धेत भाग घेऊन तपोभूमीत रंगत आणली आहे त्यामुळे वंदनीय महाराजांच्या तपोभूमी ला भक्तीचा रंग आला आहे.

.     वंदनीय राष्ट्रसंतानी लिहलेल्या आणि गायलेल्या भजनांच्या मेजवानीने संपुर्ण तपोभूमी भजनात रंगली आणि भक्ती सागराची निर्मिती होऊन या सागरात गुरुदेव भक्त मंत्रमुग्ध होऊन आकंठ बुडाले होते वंदनीय राष्ट्रसंताच्या भजनांनी तपोभूमीत भक्तिमय वातावरणाची निर्मिती झाली अनेक महिलांनी सुरेल आवाजात भजने गायली काही भजनानी तर भक्त प्रफुल्लित होऊन तल्लीन होऊन राष्ट्रसंताच्या गजरात दंग होऊन गेले अनेकानी सुरतालात मोट्या आवाजात महाराजांची भजने गायली तसेच ग्रामगितेचे महत्व सुद्धा या स्पर्धेतून गुरुदेव भक्तांना भाविकांना ग्रामगितेचे महत्व तसेच जीवनात आचरणात आणायचे महत्व कळले आहे यानंतर कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रम हभप कविताताई सांदेकर यांच्या ओजस्वी वाणीतून साकारल्या गेला.

.     यावेळी या कार्यक्रमाला अनेक भक्त भाविक गुरुदेव भक्त तसेच विठ्ठल सावरकर अध्यक्ष गुंफा समिती,मिथुन गुरनुले अध्यक्ष यात्रा महोत्सव समिती, प्रा. प्रकाश सोनुने, एस एन भोयर, प्रा. भास्कर वाढई, चंद्रभान शेंडे, सचिव गुंफा समिती पांडुरंग अडसोळे, प्रवीण मोतीराम वाघे, माजी अध्यक्ष, भोजराज कामडी, माजी अध्यक्ष रत्नमाला सोनुने, आदी सह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते गुरुदेव भक्त भजन मंडळे, ग्रामवासी उपस्थित होते.

error: Content is protected !!