Home सामाजिक नीरज आत्राम यांना “राष्ट्रीय स्वामी विवेकानंद युवा सामाजिक पुरस्कार जाहीर”

नीरज आत्राम यांना “राष्ट्रीय स्वामी विवेकानंद युवा सामाजिक पुरस्कार जाहीर”

1148

वरोरा : सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक कार्याची दखल घेऊन 2025 चा “राष्ट्रीय स्वामी विवेकानंद युवा सामाजिक पुरस्कार” वरोरा येथील कवी नीरज आत्राम यांना जाहीर झालेला आहे.

.      राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त समृद्धी प्रकाशन सिंधुदुर्ग, विसावा सोशल फाउंडेशन पुणे, हिरकणी महिला विकास संस्था पुणे, यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथे आयोजित केले आहे. हा पुरस्कार सोहळा कला, शिक्षण, साहित्य, समाज, उद्योग, युवक सांस्कृतिक, महिला अशा विविधांगी क्षेत्रात असामान्य वाटचाल करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा विलोभनीय सत्कार सोहळा आयोजित केला आहे. हा सोहळा दिनांक १२ जानेवारी २०२५ रोजी पत्रकार भवन गंजवे चौक, नवी पेठ, पुणे येथे होणार आहे.

.       या होणाऱ्या सोहळ्यामध्ये कवी नीरज आत्राम वरोरा जिल्हा चंद्रपूर यांना त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक कार्याची दखल घेऊन यावर्षीचा राष्ट्रीय स्वामी विवेकानंद युवा सामाजिक पुरस्कार जाहीर झालेला आहे. हा पुरस्कार मुरलीधर (अण्णा) मोहोळ, सहकार आणि नागरी विमान वाहतूक केंद्रीय मंत्री भारत सरकार, मेघराज राजे भोसले अभिनेते, अध्यक्ष अ. भा. मराठी चित्रपट महामंडळ, तृप्ती देसाई अध्यक्ष भूमाता ब्रिगेड, ध्रुव दातार अभिनेता, लक्ष्मीची पाऊले मालिका फेम, संजय कुलकर्णी (सुपेकर) या मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान होणार आहे. नीरज आत्राम यांना राष्ट्रीय स्वामी विवेकानंद युवा सामाजिक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचेवर सर्व स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

error: Content is protected !!