Home चंद्रपुर जिल्हा विशेष चक्क रस्त्यावर रेती खाली करून ट्रॅक्टरनी ठोकली धूम

चक्क रस्त्यावर रेती खाली करून ट्रॅक्टरनी ठोकली धूम

1149

वनकर्मचाऱ्यांनी केली होती जप्तीची कारवाई

ट्रॅक्टर चालक मालकावर वनगुन्हा दाखल

वरोरा : वनविभागाच्या हद्दीतील नाल्यातून अवैधरित्या रेती उत्खनन केल्याप्रकरणी एका ट्रॅक्टर वर जप्तीची कारवाई करण्यात आली होती. जप्ती केलेल्या ट्रॅक्टर वनविभागाच्या कार्यालयात रेती भरलेल्या ट्रॅक्टर नेत असताना ट्रॅक्टर चालकांनी चक्क रस्त्यावर रेती खाली करत ट्रॅक्टर घेऊन धूम ठोकली. याप्रकरणी ट्रॅक्टर चालकासह मालकावर 1927 काय‌द्यान्वये वनगुन्हा नोंद करण्यात आला असून अवैध रेती माफियांची मुजोरी समोर आली आहे.

.      प्राप्त माहितीनुसार मौजा सुर्ला कक्ष क्र. 14 ब मध्ये दिनांक 09/01/2025 रोजी रात्रीच्या सुमारास वनकर्मचारी दिपन के. मडावी वनरक्षक सुर्ला व अमोल डी. तिखट वनरक्षक वरोरा, गस्त करीत असतांना आरोपी भाऊराव विठ्ठल सोनुने रा. शेगाव व सुरज मुर्लीधर मोरे, रोहीत अजाब सातघरे रा. सालोरी हे ट्रॅक्टर क्रमांक MH34TC165 ने बामनडोह नाला मधुन अवैधरित्या रेतीची उत्खनन करतांना आढळून आले. सदर रेती सहित ट्रॅक्टर ट्रॉली व इतर साहित्य ताब्यात घेऊन वनगुन्हा नोंद करुन वनपरिक्षेत्र कार्यालय वरोरा येथे आणण्यात आले. त्याच रात्री गस्ती दरम्यान नयन रमेश चिंचोलकर यांचे मालकीचे ट्रॅक्टर व ट्रॉली वनविभागाच्या हद्दीतील बामनडोह नाल्यामधुन अवैद्य रित्या रेतीचा उपसा करुन बोरगाव मार्ग वाहतुक करीत असतांना आढळून आले.

.     सदर ट्रॅक्टर व ट्रॉलीस ताब्यात घेवुन वन परिक्षेत्र कार्यालय वरोरा येथे नेत असतांना नागपुर हायवेवरील चिनोरा फाटा जवळ ट्रॅक्टर मालक आरोपी नयन रमेश चिंचोलकर, सचिन उईके वाहन चालक व इतर 01 व्यक्ती यांनी हायड्रोलीकच्या सहाय्याने रेतीने भरलेली ट्रॉली रस्त्यावर खाली करत ट्रॅक्टर-ट्रॉली घेवुन पळून गेले. दोन्ही ट्रॅक्टर विरुध्द 1927 काय‌द्यान्वये वनगुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील चौकशी सतिश के. शेंडे, वनपरिक्षेत्र अधिकारी वरोरा यांचे मार्गदर्शनात आर. पी. राठोड क्षे.स. वरोरा, दिपन के. मडावी वनरक्षक सुर्ला, व अमोल डी. तिखट वनरक्षक वरोरा करीत आहे.

चालक मालकाची पोलीसात तक्रार                                                                                                                                                 अवैधरित्या रेती उत्खनन करताना रंगेहात पकडलेल्या ट्रॅक्टरला वनविभागाच्या कार्यालयात नेत असताना भर रस्त्यात रेती खाली करून ट्रॅक्टर-ट्रॉली घेऊन पळून गेलेल्या ट्रॅक्टर मालक नयन रमेश चिंचोलकर, चालक सचिन उईके व इतर 01 यांच्या विरुध्द वनपरिक्षेत्र अधिकारी एस. के. शेंडे यांनी पोलीस स्टेशन वरोरा येथे तक्रार केली असुन गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

error: Content is protected !!