विसापूर येथे साधला नागरिकांशी संवाद
बल्लारपूर : आपल्या मतरूपी आशिर्वादाने खासदार म्हणून निवडून आले. सर्वोच्च संसद मध्ये आपली प्रतिनिधी आहे. लोकसभा व विधानसभा निवडणूक दरम्यान व्यस्त होती. म्हणून आपली भेट घेता आली नाही.आपल्याशी संवाद साधावा. आपल्या अडचणी समाजावून घ्याव्यात. यासाठी बल्लारपूर तालुक्यातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे, असे प्रतिपादन खासदार प्रतिभा धानोरकर यांनी विसापूर येथे केले.
. बल्लारपूर तालुका कांग्रेस कमिटी व विसापूर कांग्रेस कमिटीच्या वतीने पंढरीनाथ देवस्थान मंगल कार्यालयात नागरिकांशी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख अतिथी खासदार प्रतिभा धानोरकर बोलत होत्या. यावेळी कांग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, तालुका कांग्रेसचे अध्यक्ष गोविंदा उपरे, माजी जि.प.सदस्य रामभाऊ टोंगे, विसापूर चे उपसरपंच अनेकश्वर मेश्राम, माजी सरपंच बंडू गिरडकर, प्रितम पाटणकर, प्रदीप गेडाम यांची उपस्थिती होती.
. दरम्यान महिला काँग्रेसच्या वतीने खासदार धानोरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून औक्षण करून केक भरवला. यावेळी नागरिकांनी वेगवेगळ्या गावातील समस्या निवारणार्थ निवेदन दिले. पांदन रस्ते, पिण्याच्या पाण्याची समस्या, पादचारी पूल, भूमिगत रेल्वे रस्त्याचे काम, प्रादेशिक पाणी पुरवठा योजना व अन्य समस्या बाबत अवगत करण्यात आले. प्रास्ताविक माजी सरपंच बंडू गिरडकर यांनी केले. आभार ग्रामपंचायत सदस्य शारदा डाहुले यांनी मानले. यावेळी कांग्रेसच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.


