चिमूर वनपरिक्षेत्रातील घटना
चिमुर : वनपरिक्षेत्रातील उपक्षेत्र खडसंगी नियतक्षेत्र खडसंगी येथील मौजा खुर्सापार ते आमडी मार्गावरील पुलाच्या खाली अस्वल मृतावस्थेत आढळले. सदर अस्वल हे नर जातीचे आहे. त्याचे वय 4 ते 5 वर्ष असून त्याच्या उजव्या बाजुने पोटावर जुनी जखम असल्याने व तो उपाशी असल्यामुळे त्यांचा मृत्यु झाला असावा असा अंदाज वनविभागाकडून वर्तविल्या जात आहे.
. चिमुर तालुक्यातील खडसंगी उपक्षेत्रापासून 10 किलोमिटर अंतरावर खुर्सापार ते आमडी रोडवरील पुलाच्या खाली 08 जानेवारी ला सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास गस्तीवर असलेल्या वनकर्मचार्यांना अस्वल (नर) मृत अवस्थेत आढळून आले. सदर अस्वलाचे वय 4 ते 4.5 वर्षाचे असून त्यांचे सर्व अवयव शाबूत होते. अस्वलाचे उजव्या बाजुने पोटावर जुनी जखम असून तो उपाशी असल्यामुळे त्यांचा मृत्यु झाला असावा असा अंदाज वर्तविल्या जात आहे.
. घटनेची माहीती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) चिमुर यांनी आपल्या चमुसह घटनास्थळी दाखल होत मृतअवस्थेत असलेल्या अस्वलाची पाहणी करून उपवनसंरक्षक, ब्रम्हपुरी वनविभाग, ब्रम्हपुरी व सहाय्यक वनसंरक्षक (तेंदु), ब्रम्हपुरी वनविभाग ब्रम्हपुरी यांना माहिती देण्यात आली. सहाय्यक वनसंरक्षक (तेंदु), ब्रम्हपुरी वनविभाग ब्रम्हपुरी व पर्यावरणवादी मंडाळाचे अमोद गौरकर घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांचे समक्ष मृत अस्वलाचा पंचनामा व जप्तीनामा नोंद करुन वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 चे कलमान्वये वनगुन्हा क्रमांक 09134/228345/2025, दिनांक 08/01/2025 नोंदविण्यात आला.
. सदर मृत अस्वलाचे शव वनविश्राम गृह खडसंगी येथे आणण्यात आले. पशुधन विकास अधिकारी चिमुर व शंकरपुर यांचे हस्ते सर्वासमक्ष शवविच्छेदन करुन रासायनिक विश्लेषणाकरीता विसेरा घेण्यात आला. त्याच ठिकाणी सर्वासमक्ष त्याचे शव दहन करण्यात आले.
. यावेळी ब्रम्हपुरी वनविभाग ब्रम्हपुरी चे सहाय्यक वनसंरक्षक डॉ. महेश गायकवाड, अमोद गौरकर, चिमुर वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर देऊरकर, उत्तम घुगरे, रुपेश चौधरी, रुपेश केदार, संजय पाटील,सुमित जाधव, योगेश अंतमवाड, रामदास नैताम वनपाल गस्तपथक व त्यांची चमु व इतर वनकर्मचारी कारवाही दरम्यान हजर होते.


