भाजपा आणि कांग्रेस मध्ये मुख्य लढतीचे चित्र
महाविकास आघाडी व महायुती आघाडी येणार संपुष्टात
विसापूर : चंद्रपूर जिल्ह्यात तीन वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक निवडणूक रखडल्या आहेत. मार्च,एप्रिल महिन्यात या निवडणुका होण्याची शक्यता आहे. लोकसभा व विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दरम्यान महाविकास आघाडी व महायुती एकत्र लढली. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका वेगवेगळ्या लढल्या जाणार आहे. जिल्ह्यात मुख्य लढत भाजपा व कांग्रेस पक्षात होण्याची खात्री आहे.यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी व महायुती आघाडी संपुष्टात येण्याची शक्यता आहे. आता चंद्रपूर जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
. २0२४ वर्ष लोकसभा आणि विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीने गाजले. या निवडणुकीत कांग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांची महाविकास आघाडी आणि भाजपा, शिवसेना (एकनाथ शिंदे),राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांची महायुती आघाडी असी लढत झाली. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक महाविकास आघाडीला आत्मविश्वास वाढविणारी ठरली. मात्र, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक महायुतीचे बळ निर्माण करणारी ठरली. आता सर्वांचे लक्ष स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक निवडणुकीकडे लागले आहे. चंद्रपूर महानगर पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत निवडणूक मागील तीन वर्षापासून रखडल्या आहेत.
. नोव्हेंबर २०२४ मध्ये पार पडलेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाने घवघवीत यश संपादन केले. चंद्रपूर जिल्ह्यातील ६ विधानसभा मतदार संघापैकी पाच आमदार भाजपने जिंकून वर्चस्व निर्माण केले आहे. कांग्रेसचे एकमेव आमदार विजय वड्डेट्टीवार यांच्या रुपाने निवडून आले. जिल्ह्यात सर्वच विधानसभा मतदार ससंघात निवडणूक कांग्रेस व भाजपा असीच झाली.त्याची पुनरावृत्ती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत होण्याची शक्यता असल्याची माहिती आहे. यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजप आणि कांग्रेस मध्ये होणार असून राजकीय धुरीण त्याच पद्धतीने आराखडे बांधत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे विभाजित शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची मोठी पंचायत होणार आहे. यावर कांग्रेस व भाजपा चे जिल्हास्तरीय नेतृत्व कसा मार्ग काढतात,याकडे लक्ष लागले आहे.
. चंद्रपूर जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक मार्च २०२२ पूर्वी होणे क्रमप्राप्त होते. मात्र राज्य निवडणूक आयोगाने दुर्लक्ष केले. राज्य सरकारने देखील नागरिकांच्या मागास प्रवर्गाचे आरक्षण पुढे करून चालढकल केली. ओबीसी आरक्षणाचा घोळ न्यायालयात अडकला आहे. नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चालू वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक निवडणूक घेण्याचे सुतोवाच केले आहे. यामुळे या निवडणुका मार्च, एप्रिल महिन्यात लागण्याची शक्यता बळावली आहे. या दृष्टीने भाजप व कांग्रेस पक्ष तयारी चालू केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तीन वर्षापासून लांबल्याने प्रशासकीय राजवट लागली आहे. परिणामी सामान्य नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.
बल्लारपूर पंचायत समिती मध्ये निवडणुकीचे वेध बल्लारपूर पंचायत समिती सन २00२ मध्ये अस्तित्वात आली. या पंचायत समितीत सभापती होण्याच्या पहिला मान शिवसेनाच्या वैजयंती सोनटक्के यांना मिळाला. त्या १४ मार्च २00२ पासून ९ फेब्रुवारी २०0५ पर्यंत सभापती होत्या. त्यानंतर भाजपचे शालिकराम पेंदराम हे १0 फेब्रुवारी २00५ पासून 13 मार्च २00७ पर्यंत सभापती झाले. भाजपाचे राजू बुद्धलवार यांनी १४ मार्च २00७ पासून १3 मार्च २0१२ पर्यंत सभापती पदावर होते. कांग्रेसचे ॲड. हरिश गेडाम यांनी १४ मार्च २0१२ पासून १४ सप्टेंबर २०१४ पर्यंत सभापती पद भूषविले. भाजपाच्या चंद्रकला बोबाटे यांनी १५ सप्टेंबर २0१४ पासून १3 मार्च २0१७ पर्यंत सभापती पदाचा कारभार सांभाळला. भाजपचे गोविंदा पोडे यांनी १४ मार्च २0१७ पासून 3१ डिसेंबर २०१९ पर्यंत सभापती होते. यानंतर भाजपाच्या इंदिरा पिपरे यांनी १ जानेवारी २0२0 पासून १3 मार्च २0२२ पर्यंत सभापती झाल्या. आता मात्र बल्लारपूर तालुक्यातील मतदारांना पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचे चांगलेच वेध लागले आहे.


