ब्रम्हपुरी : तालुक्यातील कोणत्याही वाळूघाटाचा लिलाव झाला नाही. असे असताना सर्वच घाटावरून वाळूचे अवैध उत्खनन करून वाहतूक सुरू आहे. त्यात 20 ते25 घाटावरून रात्रंदिवस वाळू चोरी सुरू आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर शासनाचा महसूल बुडत आहे मात्र याकडे महसूल विभागाचे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याने अवैद्य गौण खनिज विरोधात शिवसेनेच्या वतीने साखळी आंदोलन पुकारण्यात आले.
. ब्रह्मपुरी तालुक्याला वैनगंगा नदीचा पन्नास किलोमीटरचा किनारा लाभला आहे. तालुक्याच्या सीमेला लागून वाहणाऱ्या या नदी काठावर जवळपास २८ वाळूघाट आहेत. वैनगंगा नदीमध्ये उत्तम दर्जाची वाळू उपलब्ध आहे. आजूबाजूच्या जिल्ह्यात या वाळूला मोठी मागणी आहे. उत्तम दर्जाची वाळू आणि मागणी लक्षात घेता तस्करांनी मागील अनेक वर्षांपासून नदीला पोखरून नदीचा पाण्याचा प्रवाह बदलून टाकल्याचे चित्र आहे. तसेच वाळू पाठोपाठ मुरूम ची अवैध वाहतूक जोमात सुरु आहे.त्यात 26 डिसेंबर रोजी चांदली कालेता रोड वर अवैध मुरूम चोरीच्या ट्रॅक्टर ने एका निरापराध विधुत कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला.
. तरी सुद्धा प्रशासन निद्रा अवस्थेत असताना त्यांना जागे करण्यासाठी शिवसेने च्या वतीने 1जानेवारी पासून धरणे आंदोलन केले गेले असून अजून ही ते अवैध तस्कर गवसत नसल्याने कर्मचारी व तस्कर यांची साठ गाठ असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आज पासून शिवसेना च्या वतीने बेमुदत साखळी उपोषनास सुरुवात केली गेली आहे जर का अवैध वाळू व मुरूम तस्कर्यावर कारवाही झाली नाही तर लवकरच आमरण उपोषण करणार असे तालुका प्रमुख नरेंद्र नरड शिवसेना ब्रम्हपुरी यांनी सांगितले आहे. तर उपोषणा दरम्यान अवैध मरूम चोरी व त्या पासनू मृत्यूस जबाबदार मडंळ अधिकारी बोधनवार, तलाठी योगेश सहारे, अ.का.अतलु झोटगं शासन निर्णय प्रमाणे निलंबित झालेच पाहजे. शासन निर्णय प्रमाणे नागरीकांना ५००/- रुपये प्रती ब्रॉस डेपो प्रणालीतील वाळू मिळालीच पाहजे )शासनाच्या सर्व गृहनिर्माण योजनेकरीता घरकुल बांधकामाकरीता शासन निर्णया नुसार शुन्य रॉयल्टी तत्वावर मोफत वाळू मिळालीच पाहजे.
. चोरीच्या वाळूने शासकीय कामे बदं झालीच पाहजे. अवैध वाहतुकीचा बळी ठरलेल्या पिढीत व्यक्तीस आर्थिक मदत देण्यात यावी. मरूम व वाळू माफीयांशी साठ-गाठ असलेल्या कर्मचाऱ्यावर शिस्तभंगा ची कारवाही. रॉयल्टी तपासणी करणारे भरारी पथकाची स्थापना झालीच पाहिजे. या मागण्या धरणे आंदोलनात पूर्ण न झाल्याने दिनांक 3 जानेवारी पासून बेमुदत साखळी उपोषण सुरु करण्यात येणार आहे.


