वनविभागाची कारवाही
नेरी : चिमूर तालुक्यातील पळसगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या पिपर्ड या गावाजवळील सरांडी नदीघाटातून अवैध रेती उपसा करून वाहतूक करताना वन विभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी योगीता आत्राम वन कर्मचाऱ्यांनी रेती भरलेले दोन्ही ट्रॅक्टर ट्रॉलीसह जप्त करण्यात आले आहेत. २ जानेवारीला रात्री ११.३० वाजता वनविभागाच्या पथकाने ही कारवाई केली.
. पळसगाव वनपरिक्षेत्रातील पिपर्डा गावाजवळील संराडी नदीतून उपसा करून ट्रॅक्टरद्वारे रेतीची चोरटी वाहतूक सुरू होती. रात्री या बाबत वनविभागाला गुप्त माहिती मिळाली त्यानुसार या पथकाने घटनास्थळी दोन ट्रॅक्टर पकडले. मात्र ते ट्रॅक्टर बिना नंबरचे असल्याची माहिती वनविभागाने दिली. या दोन्ही ट्रॅक्टरच्या ट्राॅलीमध्ये घटनास्थळावर रेती भरलेली होती. मात्र ट्रॅक्टर चालकांने रेती खाली करून ट्रॅक्टर वनकार्यलयात जमा करण्यात आले आहे. सदर कार्यवाही पळसगाव वनपरिक्षेत्र अधिकारी योगिता आत्राम, क्षेत्र सहायक अमोल कवासे, विक्रांत दुधे, वनकर्मचारी वनमजूर आदींनी कारवाई केली. अधिक तपास सुरू आहे.


