Home चंद्रपुर जिल्हा विशेष गांजाची तस्करी करणारे दोघे गजाआड

गांजाची तस्करी करणारे दोघे गजाआड

1203

चंद्रपूर पोलिसांची कारवाई

एक लाखाचा गांजा जप्त

राजुरा : जिवती तालुक्यातून राजुरा येथे गांजाची विक्री करण्यासाठी निघालेल्या दोघांना चंद्रपूर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून एक लाख 95 हजारांचा तेरा किलो गांजा जप्त करण्यात आला. देवराव माणिकराव केसगिर, ( 50 ) रा. पल्लेझरी, ह.मु. रा. शेनगांव ता. जिवती तर दिनकर शंभु कुळसंगे, (50) रा. खडकी, ता. जिवती, जि.चंद्रपुर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

.       प्राप्त माहितीनुसार जिवती तालुक्यातून दोघे जण दुचाकीने गांजा घेऊन राजुरा शहरात विक्रीसाठी निघाल्याची माहिती चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावला. देवराम केसगिर, रा. खडकी, ता. जिवती, जि. चंद्रपुर हा इसम गांजा या अंमली पदार्थ घेवून विक्रीकरीता मोटारसायकीलने राजुरा येथे येणार आहे. सदर माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना होवून पोस्टे राजुरा हद्दीतील भेंडवी फाटा येथे राहून मिळालेल्या माहितीमधील इसम येताच त्याचेवर मोठ्या शिताफीने छापा टाकून त्यास मोटारसायकीलसह ताब्यात घेवून त्याची झडती घेतली असता त्याचेजवळ असलेल्या पोत्यामध्ये एकुण १३.८३५ किग्रॅम गांजा किंमत १ लाख ,९५, हजार रूपये, तसेच हिरो कंपनीची मोटारसायकील किंमत ५०,हजार रूपये – असा एकुण २,लाख ४५, हजार – रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी देवराव माणिकराव केसगिर, दिनकर शंभु कुळसंगे, दोघांनाही अटक करून यांच्या विरूद्ध कलम ८ (क), २१ (ब) ii (ब), २९ एन.डी.पी.एस. प्रमाणे पोलीस स्टेशन राजुरा येथे गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींना पुढिल तपासकामी पोलीस स्टेशन राजुरा यांचे ताब्यात देण्यात आले.

.      सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक, चंद्रपुर, अपर पोलीस अधिक्षक, चंद्रपुर यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे
पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, शिवाजी कदम, पोलीस निरीक्षक, पोस्टे गडचांदुर यांचे नेतृत्वात सपोनि. दिपक काँक्रेडवार, पोउपनि, विनोद भुरले, पोउपनि. मधुकर सामलवार, पोहवा. किशोर वैरागडे, दिपक डोंगरे, नापोअं. संतोष येलपुलवार, पोशि. गोपाल आतकुलवार, गोपीनाथ नरोटे, चापोहवा. दिनेश आराडे स्थागुशा चंद्रपुर यांनी केली

अवैध रित्या गांजा विक्री करणार्‍यांवर कारवाई सुरू                                                                                                                              चंद्रपुर जिल्ह्यामध्ये पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध ड्रग्स, गांजा अशा अंमली पदार्थ विक्री करणाऱ्याविरोधात धडक मोहीम चंद्रपुर पोलीसांच्या वतीने चालु आहे. त्याच मोहीमेच्या अनुषंगाने चंद्रपुर पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक स्थापन केले असून सदर पथकाच्या माध्यमातुन मोठ्याप्रमाणात अवैधरित्या गांजा विक्री करणाऱ्यांची माहिती काढून त्यावर कारवाई सुरू आहे. आज

error: Content is protected !!