Home चंद्रपुर जिल्हा विशेष नागभीड ते कोथूळना मार्गांवर खड्डेच खड्डे

नागभीड ते कोथूळना मार्गांवर खड्डेच खड्डे

1211

सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

नागभीड : मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून नागभीड ते बोथली कोथूळना या मार्गाचे डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र या मार्गांवर आज खड्डेच खड्डे पडलेले आहेत. सन 2019 मध्ये या मार्गाचे डांबरीकरण करण्यात आले. आणी पाच वर्षासाठी या मार्गाची दुरुस्ती साठी निधी राखून ठेवण्यात आला.देखभाल दुरुस्ती ची हमी 28/5/2019 ते 27/5/2024 प्रयन्त होती. परंतु या मार्गाची दुरुस्ती झाली नाही. या दुरुस्तीचा खर्च 14.40 लक्ष रुपये हे पाच वर्षसाठी खर्च करायचे होते. निधी असूनही मार्गाची दुरुस्ती होत नाही. त्यामुळे शासनानी यांची दखल घ्यावी. नागभीड हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने या मार्गांवरून अनेक नागरिक, शाळकरी विद्यार्थी ये जा करीत असतात.

.      जागोजागी रस्ता फुटला असल्याने जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. या मार्गांवरून दुचाकी, चार चाकी वाहने सुद्धा ये जा करतात. त्यामुळे या मार्गाची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. पाच वर्ष दुरुस्तीचे असतानी या मार्गाची दुरुस्ती झाली नाही. याला जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभाग आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याने अनेक रस्ते निकृष्ट दर्जाचे आहेत. एका महिन्यात रस्ते फुटलेले आहेत. रस्त्याच्या साईड भरल्या जात नाही. त्यामुळे जनतेला नाहक त्रास सहन करावा लागतो. शासनाने याकडे लक्ष द्यावे. तालुक्यातील रस्त्याचे निकृष्ट होत असलेले कामाची चौकसी करून दोषीवर कारवाही करावी अशी जनतेकडून मागणी होत आहे.

error: Content is protected !!