Home चंद्रपुर जिल्हा विशेष कारल्याची भाजी केली म्हणून पोटच्या मुलाने दारूच्या नशेत केली आईची हत्या

कारल्याची भाजी केली म्हणून पोटच्या मुलाने दारूच्या नशेत केली आईची हत्या

299

मूल तालुक्यातील डोंगरगाव येथील धक्कादायक घटना

आरोपी मुलाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

चंद्रपूर : केवळ कारल्याची भाजी बनवल्याच्या किरकोळ कारणावरून एका व्यसनी मुलाने आपल्या ६५ वर्षीय वृद्ध आईची निर्घयपणे हत्या केल्याची खळबळजनक घटना मूल तालुक्यातील डोंगरगाव येथे घडली आहे. सुमित्रा पेटकुले (६५) असे मृत मातेचे नाव असून, आरोपी मुलगा जगदीश दशरथ पेटकुले (३५) याला पोलिसांनी अटक केली आहे.

.      मिळालेल्या माहितीनुसार, जगदीशला दारूचे प्रचंड व्यसन असून याच कारणावरून त्याची पत्नी दोन महिन्यांपूर्वीच मुलांना घेऊन माहेरी निघून गेली होती. १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी जगदीश दारूच्या नशेत घरी आला. जेवणात आईने कारल्याची भाजी बनवल्याचे पाहून तो संतापला. “कारले का बनविले ?” यावरून त्याने आईशी वाद घालत तिला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या क्रूर मारहाणीत सुमित्रा यांचा जागीच मृत्यू झाला.

.      गावकऱ्यांनी या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना दिली. मूल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि आरोपी जगदीशला बेड्या ठोकल्या. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

error: Content is protected !!