Home चंद्रपुर जिल्हा विशेष वरोरा-चिमूर सिमेंट रस्ता की मृत्यूचा सापळा ?

वरोरा-चिमूर सिमेंट रस्ता की मृत्यूचा सापळा ?

366

निकृष्ट कामामुळे अखेर अपघात : तरुण जखमी !

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षावर नागरिकांचा संताप

वरोरा : कोट्यवधी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेला वरोरा-चिमूर हा मुख्य सिमेंट रस्ता आता वाहनधारकांसाठी कर्दनकाळ ठरत आहे. या मार्गावर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यामुळे अखेर ३ फेब्रुवारी रोजी एक भीषण अपघात घडला. माता महाकाली पॉलिटेक्निक कॉलेज परिसरात एका दुचाकीला ट्रकने धडक दिली, ज्यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे.

रस्त्याच्या मधोमध ‘मृत्यूचे’ छिद्र
या मार्गावरील माता महाकाली पॉलिटेक्निक आणि सिद्धिविनायक फार्मसी कॉलेजच्या दरम्यान रस्त्याच्या मधोमध एक मोठा आणि खोल खड्डा पडला आहे. हा रस्ता नवा असूनही त्याला जागोजागी भेगा पडल्याने कामाच्या दर्जावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. ३१ जानेवारी रोजी ‘नवामार्ग न्यूज पोर्टल’ने या संदर्भात वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. मात्र, निगरगट्ट प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले, ज्याचा परिणाम मंगळवारी झालेल्या अपघातात दिसून आला.

वरोरा-चिमूर महामार्ग बनतोय 'डेथ ट्रॅप'➡️ सिमेंट रस्त्याच्या मधोमध जीवघेणा खड्डा !  ➡️ विद्यार्थी आणि नागरिकांचा जीव टांगणीला  ➡️ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे संताप
वरोरा-चिमूर महामार्ग बनतोय ‘डेथ ट्रॅप’ ➡️ सिमेंट रस्त्याच्या मधोमध जीवघेणा खड्डा ! ➡️ विद्यार्थी आणि नागरिकांचा जीव टांगणीला ➡️ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे संताप https://navamarg.com/2026/01/17425/

प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप
दिवस-रात्र वर्दळ असलेल्या या महामार्गावर अचानक येणाऱ्या खड्ड्यामुळे वाहनधारकांना जीवघेणी कसरत करावी लागते. सामाजिक कार्यकर्ते प्रमोद नागापुरे यांनी यापूर्वीच इशारा दिला होता की, प्रशासन एखाद्या मोठ्या बलिदानाची वाट पाहत आहे का ? रस्ता बांधणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करून या मार्गाचे तातडीने दर्जेदार दुरुस्तीकरण करावे, अशी मागणी आता जोर धरत आहे.

.       एकीकडे शासन रस्ते विकासाचे दावे करत असताना, दुसरीकडे निकृष्ट कामामुळे सर्वसामान्यांचे जीव धोक्यात येत आहेत. या अपघातानंतर तरी सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून जागा होणार का, हाच मुख्य प्रश्न आहे.

error: Content is protected !!