अकोला येथील माजी सैनिकांचा शाळा व माजी विद्यार्थी संघातर्फे हृदयस्पर्शी सत्कार
अल्प लोकसंख्येच्या गावातून देशसेवेसाठी झेप घेणार्यांचा ‘जि.प. शाळा अकोला’ येथे सन्मान
वरोरा : तालुक्यातील अकोला नं. १ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने देशसेवा करून सेवानिवृत्त झालेल्या नारायण बापूराव गाढवे आणि गजानन दशरथ उमरे या दोन वीरपुत्रांचा नुकताच भव्य नागरी सत्कार करण्यात आला. शाळा आणि माजी विद्यार्थी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या अनपेक्षित सन्मानाने दोन्ही माजी सैनिक भारावून गेले होते. आपल्याच गावातील शाळेत शिक्षण घेतलेल्या माजी सैनिकांचा सन्मान होत असल्याने गावकऱ्यांसह त्यांच्या सवंगडयांनाही आनंद झाला.
. अकोला नं.१ हे एक छोटंसं गाव. या गावाची लोकसंख्या अवघी सव्वादोनशेच्या घरात. येथील नारायण गाढवे नावाच्या युवकांने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या भरोशावर भारतीय सैन्यात नोकरी मिळवली होती. त्यांच्याच पावलावर पाऊल देऊन गजानन दशरथ उमरे हे सुद्धा सैन्यात भरती झाले. दोघांनीही भारताच्या वेगवेगळ्या भागात आपली कामगिरी चोखपणे बजावली. देशाच्या सिमेचे रक्षण केले. दोघेही आपली पंधरा वर्षाची सेवा बजावून सन्मानानी निवृत्त झालेत. ते दोघेही अकोला नं.१ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे माजी विद्यार्थी होते.
. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विठ्ठल उमरे हे होते. यावेळी प्रमुख पाहुणे शामदेवराव उमरे, उईके गुरुजी, शामराव मटाले, भगवान उमरे, विठ्ठल पुसाम, भास्कर चवले, सदाशिव उमरे, माजी विद्यार्थी संघाचे दिवाकर रंदई, केशव उमरे, गजानन शामदेव उमरे, निलेश काकडे, गजानन बुटके, कुसुम सावसाकडे, दिलीप भोगेकर, विठ्ठल नन्नावरे, पुंडलिक नन्नावरे, सदाशिव नत्थूजी उमरे, प्रवीण आत्राम, मनोज उमरे, अरुण उमरे, अल्का उईके आदी मान्यवर उपस्थित होते. सत्कारमूर्ती म्हणून नारायण गाढवे आणि गजानन उमरे यांची विशेष उपस्थिती होती. त्यानंतर दोन्ही माजी सैनिकांचा शाल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन त्याचा सत्कार करण्यात आला.
. या कार्यक्रमाचे संचालन व प्रास्तविक अरूण उमरे यांनी केले. आभार अल्का धुर्वे यांनी मानले. या कार्यक्रमाला विद्यार्थी, अंगणवाडी कर्मचारी, शापोआ कर्मचारी, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


