Home सामाजिक जिवती तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी फारुख शेख 

जिवती तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी फारुख शेख

453

जिवती : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, मुंबईशी संलग्न असलेल्या जिवती तालुका मराठी पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पाटण येथे उत्साहात संपन्न झाली. या सभेत सन २०२५-२६ या वर्षासाठी तालुका अध्यक्ष म्हणून फारुख अब्दुल शेख यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

.       जिल्हाध्यक्ष बंडू लडके आणि जिल्हा उपाध्यक्ष उमाकांत धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. नवीन कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी सीताराम मडावी तर सचिवपदी सुधाकर नागोसे यांची एकमताने नियुक्ती करण्यात आली.

.       या सभेला पत्रकार बंटी ब्रामने, रवी तेलंग, आकाश उईके, रुपचंद पवार, रफिक शेख आणि सुनील वाघमारे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. जिवती सारख्या दुर्गम भागात पत्रकारांचे संघटन मजबूत करून जनसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचा संकल्प नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी यावेळी सोडला.

.        नूतन कार्यकारिणी जाहीर होताच राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून फारुख शेख व त्यांच्या टीमवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

error: Content is protected !!