Home सामाजिक विद्यार्थ्यांनी अनुभवली कृषी उद्योगाची कार्यशाळा

विद्यार्थ्यांनी अनुभवली कृषी उद्योगाची कार्यशाळा

514

त्रिमूर्ती गूळ उद्योग व वनक्रांती फार्मर प्रोडूसर कंपनीला क्षेत्र भेट

भद्रावती : पुस्तकी ज्ञानाला प्रत्यक्ष अनुभवाची जोड देण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय, नंदोरी (बु.) येथील विद्यार्थ्यांनी मंगळवार दि. ३० ला कृषी उद्योग क्षेत्राला भेट दिली. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी त्रिमूर्ती गूळ उद्योग आणि वनक्रांती फार्मर प्रोडूसर कंपनी, नंदोरी (बु.), ता. भद्रावती येथील प्रकल्पांची पाहणी केली.

.         या भेटीदरम्यान प्रगतशील उद्योजक शेतकरी सुनील उमरे यांनी विद्यार्थ्यांना ऊसापासून नैसर्गिक पद्धतीने गूळ तयार करण्याची प्रक्रिया आणि या उद्योगातील संधींबद्दल माहिती दिली. त्याचप्रमाणे, युवा शेतकरी हर्षल राजूरकर यांनी वनक्रांती फार्मर प्रोडूसर कंपनीच्या माध्यमातून शेतकरी संघटन आणि शेतीमालावर प्रक्रिया करून त्याचे मूल्यवर्धन कसे करावे, यावर प्रभावी मार्गदर्शन केले. आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन शेतीला व्यवसायाचे स्वरूप कसे देता येते, हे त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले.

.       याप्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अश्लेषा जिवतोडे भोयर यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अशा भेटींचे महत्त्व अधोरेखित केले. या क्षेत्र भेटीला शिक्षक चंदू तांबेकर, नितेश मिलमिले, विनोद खोब्रागडे, तसेच शाळेचे कर्मचारी प्रमोद सुर, देविदास विरुटकर आणि सदाशिव वाढई प्रामुख्याने उपस्थित होते.

.       या भेटीमुळे ग्रामीण भागातील उद्योजकतेची प्रत्यक्ष ओळख विद्यार्थ्यांना झाली, ज्यामुळे त्यांच्यामध्ये भविष्यातील रोजगाराच्या संधींबद्दल नवा दृष्टिकोन निर्माण झाला आहे.

error: Content is protected !!