आमदार करण देवतळे यांच्या हस्ते उद्घाटन
चपराळा येथे विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा जागर
भद्रावती : पंचायत समिती भद्रावती, बीट-घोडपेठ अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चपराळा येथे ‘बीट स्तरीय शालेय बालक्रीडा व सांस्कृतिक महोत्सव २०२५-२६’ अत्यंत उत्साहात आणि आनंदात पार पडला. या महोत्सवाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले.
. कार्यक्रमाचे उद्घाटन वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राचे आमदारकरण देवतळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत खेळाचे आणि कलेचे जीवनातील महत्त्व अधोरेखित केले.
. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रविंद्र श्रीनिवास शिंदे, भद्रावती तालुका अध्यक्ष शामसुंदर उरकुडे, पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश मत्ते, सहायक गटविकास अधिकारी आकनुरवार, भद्रावतीचे गटशिक्षणाधिकारी प्रकाश महाकुळकर आणि घोडपेठ बीटच्या विस्तार अधिकारी स्वाती महाजन यांची उपस्थिती होती. तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षकवृंद, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
. या महोत्सवात विविध क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. क्रीडा स्पर्धांमधून विद्यार्थ्यांमध्ये संघभावना आणि शिस्तीचे दर्शन घडले, तर सांस्कृतिक कार्यक्रमांमधून त्यांनी आपल्या कलागुणांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढवण्यासाठी हा महोत्सव एक उत्तम उदाहरण ठरला.
. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजक, शिक्षक आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व सहभागी शाळांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


