युवासेनेचे ठाणेदारांना निवेदन
पोलिस संरक्षणाची मागणी
भद्रावती : शिवसेना लोकसभासंघटक मुकेश जिवतोडे आणि जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांनी ३ डिसेंबर २०२५ रोजी वरोरा शहरातील अवैध सुगंधित तंबाखू आणि अमली पदार्थ साठ्याबाबत महत्त्वपूर्ण माहिती पोलिस प्रशासनाला दिली होती. त्यांच्या दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी शहरातील विविध ठिकाणी कारवाई करत अवैध धंद्यावर मोठी लगाम घातली.
. या कारवाईनंतर संबंधित अवैध धंदे करणाऱ्या व्यक्तींनी सोशल मीडियावर घाणेरडी भाषा वापरत शिवीगाळ, बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात जीवितहानीचा धोका निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
. यासंदर्भात भद्रावती पोलीस स्टेशन चे ठाणेदार योगेश पारधी यांना निवेदन दिले. हे निवेदन युवासेना जिल्हा प्रमुख आलेख रहे व युवासेना लोकसभा सचिव सूरज शहा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवासेना जिल्हा संघटक सुमित हस्तक यांच्या नेतृत्वात देण्यात आले.
. या निवेदनात म्हटले आहे की, सोशल मीडियावर शिवीगाळ व बदनामी करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत. संबंधित खात्यांची चौकशी करून दंडात्मक कारवाई करावी. अवैध व्यवसायिकाकडून मुकेश जिवतोडे यांच्या जीवाला धोका असल्याने त्यांना तात्काळ पोलिस संरक्षण उपलब्ध करून द्यावे.
. युवासेना सदैव सामाजिक हित आणि कायद्याच्या अंमलबजावणीसाठी लढत राहील, तसेच अवैध घटकांविरोधात उभे राहणाऱ्यांचे रक्षण करणे प्रशासनाची जबाबदारी असल्याचे यावेळी सांगण्यात आले. निवेदन देतांना युवासेना शहर प्रमुख राज चव्हाण, गोलू आस्वले, अनोखा गेडाम, दिनेश पचारे, राकेश पचारे, तृणाल उंबरकर, सुमित मोजे, सिद्धार्थ मेश्राम, सुरेश पार्थमवर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

