Home राजकीय बल्लारपूर नगरपालिकेत कांग्रेसच्या बंडखोरीची डोकेदुखी

बल्लारपूर नगरपालिकेत कांग्रेसच्या बंडखोरीची डोकेदुखी

469

पक्षविरोधी करणाऱ्यांना दाखवला जाईल घरचा रस्ता

शहर कांग्रेसचे अध्यक्ष देवेंद्र आर्य यांचा इशारा

बल्लारपूर : चंद्रपूर जिल्ह्यात सर्वात मोठी नगरपालिका असलेल्या बल्लारपूर नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक ऐन थंडीच्या वातावरणात गरम होत आहे. अशातच कांग्रेस पक्ष बंडखोरीने ग्रासला आहे. कांग्रेसचे माजी नगराध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव घनश्याम मुलचंदानी यांनी राज्य नेतृत्वाने सहा वर्षासाठी कांग्रेसमधून निलंबित केले आहे. आता ही गाज स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांवर येणार आहे. पक्षविरोधी काम करणाऱ्यांना घरचा रस्ता दाखविण्याचा इशारा बल्लारपूर शहर कांग्रेसचे अध्यक्ष देवेंद्र आर्य यांनी दिला आहे.

.       बल्लारपूर नगरपालिकेत नगराध्यक्ष पदासाठी कांग्रेस पक्षाने अलका अनील वाढई यांना उमेदवारी जाहीर केली. याला विरोध म्हणून घनश्याम मुलचंदानी यांनी उबाठा (शिवसेना) पक्षाकडून स्नुषा चैताली दीपक मुलचंदानी यांना रिंगणात उतरवले आहे.यामुळे शहरात कांग्रेस विभागली आहे. तरीही कांग्रेसने नगराध्यक्ष पदासह 32 उमेदवारांना निवडणुकीच्या मैदानात सोडले आहे.

.     बल्लारपूर शहर कांग्रेसचे अध्यक्ष देवेंद्र आर्य यांनी म्हटले की, कांग्रेस पक्षाने नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक करीता नगराध्यक्ष व नगरसेविक पदासाठी 32 उमेदवार ऊभे केले आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवार विरोधात काम करतील, अशा कांग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांविरोधात निलंबनाची कारवाई केली जाणार आहे. नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत कांग्रेसचे वातावरण अनुकूल आहे. शिस्तभंगाची कारवाई टाळण्यासाठी कांग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी त्याच प्रमाणे शहर कांग्रेस,युवक कांग्रेस, एन.एस.यु.आय., सेवादल, इंटक पदाधिकाऱ्यांनी कांग्रेसच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचार करुन निवडून आणण्यासाठी सहकार्य करावे, असे आव्हान शहर कांग्रेसचे अध्यक्ष देवेंद्र आर्य यांनी केले आहे.

बल्लारपुरात नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षासह १९0 रिंगणात                                                                                                                                                                                          बल्लारपूर नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक येत्या २ डिसेंबर रोजी होऊ घातली आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या बल्लारपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी ८ महिलांनी दावेदारी पुढे केली आहे. तर 34 नगरसेवक पदांसाठी १८२ जणांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. येथे मुख्य लढत भाजपा व कांग्रेस पक्षात होणार असली,तरी उबाठा ( शिवसेना ), बहुजन समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडी व रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारी मुळे येथील लढत बहुरंगी होण्याची शक्यता आहे.येथे १९0 उमेदवारांपैकी नगराध्यक्षासह 34 नगरसेवकांच्या निवडीवर 83 हजार 821 मतदार शिक्कामोर्तब करणार आहे.

error: Content is protected !!