Home राजकीय नंदोरी–मांगली जिल्हा परिषद क्षेत्रात ‘अंबर’ चा प्रभाव

नंदोरी–मांगली जिल्हा परिषद क्षेत्रात ‘अंबर’ चा प्रभाव

513

राजकीय चर्चांना उधाण

नंदोरी–मांगली जिल्हा परिषद निवडणुकीला रंगत

अंबर जिवतोडे यांच्या उमेदवारीच्या चर्चांना वेग

चंद्रपूर :  नंदोरी–मांगली जिल्हा परिषद क्षेत्र सर्वसाधारण घोषित झाल्याने राजकीय समीकरणे हलू लागली असून उमेदवारीसाठी दावेदारांची चढाओढ सुरू झाली आहे. ओबीसी नेते अशोक जिवतोडे यांचे सुपुत्र अंबर जिवतोडे यांनी या क्षेत्रातून निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली असून भाजपकडून त्यांना ग्रीन सिग्नल मिळाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागला आहेत.

.          नंदोरी गावातील शीर नदीवरील पुलावरील बंधाऱ्याचे काम रखडत असल्याने ग्रामस्थांनी बहिष्काराची भूमिका घेतली होती. मात्र अंबर जिवतोडे यांनी स्वतःच्या खर्चातून पुलाचे काम पूर्ण करण्याची तयारी दाखवल्याने ग्रामस्थांचा रोष निवळतोय, अशी चर्चा आहे. यामुळे निवडणुकीत त्यांना लाभ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

.           जिल्हा परिषदेचे आरक्षण जाहीर होण्याअगोदरच अंबर जिवतोडे यांनी गावोगाव ऑनलाइन कॅम्प राबवत प्रचारमोहीम गतीमान केली आहे. नंदोरी–मांगली जागा सर्वसाधारण आहे.

.            या क्षेत्रातील जिवतोडे कुटुंबाचा राजकीय इतिहास भक्कम असून, यापूर्वी दिवंगत संजय जिवतोडे आणि त्यानंतर भाजपच्या अर्चना जिवतोडे यांनी येथे विजय मिळवला होता. आता जागा सर्वसाधारण असल्याने अंबर जिवतोडे हे या क्षेत्रातून थेट मैदानात उतरणार असल्याने चित्र अधिक रंगतदार झाले आहे.

.          नंदोरी हे या भागातील मोठे गाव असल्याने याठिकाणी मिळणारे मतदानच विजयाचे प्रमुख सूत्र ठरते. नंदोरी सह परिसरातील मतदारांची मने कोणाच्या बाजूने झुकतात, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

.         राजकीय जाणकारांच्या मते, नंदोरी–मांगली जिल्हा परिषद निवडणूक यंदा चुरशीची आणि दमदार लढत ठरणार असून आघाडी–पछाडीचे राजकीय गणितही यानिमित्ताने बदलू शकते.

error: Content is protected !!