बल्लारपूर : बल्लारपूर पंचायत समिती १४ मार्च २०0२ रोजी अस्तित्वात आली. तेव्हा पासून या पंचायत समितीत आतापर्यंत सात जणांनी सभापती म्हणून कार्यकाळ पार पाडला. आता १ आक्टोंबर रोजी पंचायत समितीला आरक्षण सोडतीत अनुसूचित जमाती महिलासाठी राखीव झाले. यामुळे बल्लारपूर पंचायत समितीवर चौथ्यांदा महिला सभापती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
. बल्लारपूर पंचायत समिती मध्ये पहिल्या महिला सभापती होण्याचा मान विसापूर येथील वैजयंती दिलीप सोनटक्के यांना मिळाला.त्यांनी १४ मार्च २00२ पासून ९ फेब्रुवारी २०0५ पर्यंत पंचायत समिती मध्ये कार्य केले. दुसऱ्या महिला सभापती ईटोली येथील चंद्रकला नरेंद्र बोबाटे झाल्या. त्या १५ सप्टेंबर २0१४ ते 13 मार्च २0१७ दरम्यान कारभारी होत्या. तिसऱ्यांदा सभापती म्हणून मानोरा येथील इंदिरा रमेश पिपरे झाल्या. त्यांनी पंचायत समिती मध्ये १ जानेवारी २0२0 ते 13 मार्च २0२२ पर्यंत सत्ता राखली.
. आता पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक नंतर सभापती म्हणून अनुसूचित जमाती महिला चौथ्यांदा महिला सभापती होणार आहे. त्यांचा कार्यकाळ अडीच वर्षाचा असणार आहे. विशेष म्हणजे महिला सभापती पद हे एकदा शिवसेना व दोनदा भाजपा पक्षाच्या उमेदवार ला मिळाले आहे. बल्लारपूर पंचायत समिती मध्ये विसापूर, बामणी, कोठारी व पळसगाव हे चार गण आहे. यातील कोणत्या गणासाठी अनुसूचित जमाती महिलासाठी राखीव होते,ते येत्या 13 आक्टोंबर रोजी होणाऱ्या आरक्षण सोडतीत दिसून येणार आहे.
बल्लारपूर पंचायत समितीत भाजपा व कांग्रेस मध्ये लढत आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक होऊ घातली आहे. यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष पद अनुसूचित जाती महिलासाठी राखीव झाले आहे. पंचायत समिती सभापती आरक्षण सोडत नुकतीच जाहीर झाले आहे. येत्या 13 आक्टोंबर रोजी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांची आरक्षण सोडत काढली जाणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. बल्लारपूर तालुक्यात विसापूर- बामणी व कोठारी – पळसगाव दोन जिल्हा परिषद गट आहे. त्याचप्रमाणे पंचायत समितीचे विसापूर, बामणी, कोठारी व पळसगाव असे चार गण आहे. आजतागायत येथे राजकीय लढत भाजपा व कांग्रेस पक्षात झाली आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक यामध्ये दुहेरीच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष पद देखील बल्लारपूर तालुक्यात मिळण्याची शक्यता राजकीय धुरीण व्यक्त करत आहे. यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक चुरशीची होणार आहे.


