Home चंद्रपुर जिल्हा विशेष भाजपाचे प्रवक्ता विरोधात गुन्हा दाखल करा

भाजपाचे प्रवक्ता विरोधात गुन्हा दाखल करा

592

बल्लारपूर येथे कांग्रेसचे ठाणेदारांना निवेदन

विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी

बल्लारपूर : देशाचे विरोध पक्षनेते राहूल गांधी यांना सार्वजनिक प्रसार माध्यमावर जीवे मारण्याची धमकी दिली. भाजपाच्या प्रवक्त्यांचे सदर कृत्य समाजात वितुष्ट निर्माण करणारे आहे. लोकशाही व्यवस्थेला काळीमा फासणारे आहे. याचे पडसाद बल्लारपूर शहरात उमटले असून “राहूल गांधी यांच्या छातीत गोळी घातली जाईल” असे वक्तव्य करणारे भाजपाचे प्रवक्ता पिंटू महादेव यांचेवर कठोर कारवाई करून गुन्हा दाखल करा, अशी मागणी बल्लारपूर शहर कांग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ठाणेदार बिपीन इंगळे यांना सादर केलेल्या निवेदनातून केली आहे.

.       भाजपाचे पक्ष प्रवक्ते पिंटू महादेव यांनी एका न्युज चैनल चर्चेदरम्यान देशाचे विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांच्या संदर्भात आक्षेपार्ह विधान केले. ही २५ सप्टेंबर २०२५ रोजी न्युज चैनलवर दाखविण्यात आली. राहूल गांधी देशपातळीवर सामाजिक न्यायाची लढाई लढत आहे. विद्यमान सत्ता दर दिवसागणिक संविधानावर हल्ला करत आहे. समाजात दुहीचे वातावरण निर्माण करत आहे.

.        राहूल गांधी जनतेच्या हितासाठी व लोकशाहीचे संवर्धन करण्यासाठी लढा देत आहे. देशातील जनतेची दिशाभूल करणारी भाजपा प्रवक्त्याच्या माध्यमातून वाचाळवीर झाली आहे. संघ व भाजपाच्या विचारसरणीने राष्ट्रपिता महात्मा गांधी, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचा बळी घेतला आहे. आता तिच विचारसरणी राहूल गांधी यांच्या जीवावर उठली आहे. राहूल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देणारे भाजपाचे प्रवक्ता पिंटू महादेव यांचेवर कठोर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी बल्लारपूर येथील कांग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ठाणेदार बिपीन इंगळे यांना सादर केलेल्या निवेदनातून केली.

.         निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात कांग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव घनश्याम मुलचंदानी, रोशनलाल बिट्टू, शहर अध्यक्ष देवेंद्र आर्य, युवक काँग्रेस सरचिटणीस चेतन गेडाम, सचिव याकुब पठाण, माजी नगराध्यक्ष सुनंदा आत्राम, अफसाना सय्यद, इस्माईल ढाकवाला, प्राणेश अमराज, नरेश गुंडलापल्ली, मेहमुदभाई पठाण, मंगेश बावणे, सचिन तोटावार, चंचल मून, सुरेश बोप्पनवार, आश्चर्य माकोडे, प्रफुल बोप्पनवार, प्रवीण पोहनकर, क्षीतीज पेडपल्लीवार आदींचा समावेश होता.

error: Content is protected !!