महिला शेतकऱ्यांची निवेदनातून आग्रही मागणी
समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाचा गाठला उंबरठा
बल्लारपूर : तालुक्यातील विसापूर शेतशिवारात पाणंद रस्त्यांच्या समस्येने भीषण रूप धारण केले आहे. याचा पावसाळ्यात शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासनाने ही समस्या तातडीने सोडवावी. यासाठी विसापूर येथील महिला शेतकऱ्यांनी आक्रमक धोरण अवलंबले.
. यासंदर्भात बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा माजी अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार व चंद्रपूर च्या खासदार प्रतिभा धानोरकर यांना निवेदन सादर करून विसापुरातील पाणंद रस्त्यांची समस्या सोडवा, म्हणून साकडे घातले. त्यांचा प्रवास येथेच थांबला नाही, तर जिल्हाधिकारी चंद्रपूर, तहसिलदार व गटविकास अधिकारी बल्लारपूर यांचा उंबरठा देखील गाठून पाणंद रस्त्यांची तीव्रता लक्षात आणून दिली.
. बल्लारपूर तालुक्यातील विसापूर ग्रामपंचायत सरपंच वर्षा कुळमेथे व उपसरपंच अनेकश्वर मेश्राम, ग्रामपंचायत सदस्य शारदा डाहुले, रिना कांबळे, हर्षला टोंगे, सुरेखा ईटनकर, विद्या देवाळकर, शशीकला जीवने यांच्या नेतृत्वात विसापूर येथील महिला शेतकरी आशा काळे, मंजुषा पावडे, छाया टोंगे, प्रफुल्ला डाहुले, प्रितम पाटणकर, सुलभा टोंगे, पुजा डाहुले, अश्विनी काळे, शारदा पावडे, मंदा टोंगे, मंजुषा अमित पावडे, वर्षा टोंगे, मंजुषा ताजने, तानेबाई टोंगे, ललिता टोंगे, मंजुषा टोंगे, राजश्री परसूटकर, शशीकला वडस्कर आदींनी पाणंद रस्त्यांची समस्या सोडविण्याची आग्रही मागणी लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडे केली.
विसापूर शेतशिवारातील प्रलंबित पादंण रस्ते बल्लारपूर तालुक्यातील विसापूर शेतशिवारात पाणंद रस्त्यांची समस्या शेतकऱ्यांना व शेतमजूरांना मोठी अडचणीत आणणारी आहे. यावर लोकप्रतिनिधी व प्रशासनाने तोडगा काढावा, असी मागणी आहे. विलास टोंगे, शालिक टोंगे ते हनुमान मंदिर रिठ, वसंता गिरडकर ते मनोज टोंगे, अनिल वडस्कर ते सदाशिव गिरडकर, लक्ष्मण पावडे ते हनुमान मंदिर संगम, मधुकर भोयर ते नांदगाव (पोडे) रस्ता, गोसाई डाहुले ते विजय गिरडकर, दिनकर वडस्कर ते विलास टोंगे आणि शंकर उपरे ते पोडे यांच्या शेत दरम्यान पाणंद रस्ते प्रलंबित आहेत. सदर पाणंद रस्ते खडीकरण करून वाहतूक योग्य करावे.शेतकऱ्यांचा जाच कमी करून दिलासा देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.


