बल्लारपूर तालुक्यात दोन गट व चार गण
नागरिकांना लागले सार्वत्रिक निवडणुकीचे वेध
बल्लारपूर : जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक करिता अंतीम प्रभाग रचना केली. त्यानुसार बल्लारपूर तालुक्यात ४५- विसापूर – बामणी व ४६ – पळसगाव हे दोन जि.प.गट तर ८९- विसापूर , ९0 – बामणी,९१- पळसगाव व ९२- कोठारी चार पंचायत समिती गण निर्धारित केले आहे. तब्बल चार वर्षाच्या कालखंडानंतर होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणूक साठी नागरिकांना वेध लागले आहे. आता जिल्हा परिषद व पंचायत समिती मध्ये आरक्षणाकडे गाव पुढाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
. चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या ५६ गटासाठी व १५ तालुक्यातील ११२ पंचायत समितीच्या गणाची अंतीम प्रभाग रचना करण्यात आली आहे. याची माहिती राजपत्रात प्रसिध्द केली आहे.आता मात्र नागरिकांचे लक्ष आरक्षण सोडतीकडे लागले आहे. बल्लारपूर तालुक्यातील ४५ विसापूर – बामणी जिल्हा परिषद गटात विसापूर, बामणी (दुधोली), दहेली, नांदगाव (पोडे) व हडस्ती या पाच ग्रामपंचायतीचा समावेश करण्यात आला आहे. या अंतर्गत ११ गावे समाविष्ट केले आहे.
. ४६ पळसगाव – कोठारी जि.प.गटात पळसगाव, मानोरा, कवडजई, किन्ही, कोर्टीमक्ता, ईटोली, गिलबीली, कोठारी, काटवली (बामणी), आमडी, कळमना व लावारी या १२ ग्रामपंचायतीचा समावेश करण्यात आला आहे. या गटात २२ गावे समाविष्ट केल्या गेल्या आहेत. त्याचप्रमाणे ८९ विसापूर पंचायत समिती गणात केवळ विसापूर ग्रामपंचायत मधील मतदार समाविष्ट केले आहे. ९0 बामणी पंचायत समिती गणात बामणी (दुधोली),द हेली, नांदगाव (पोडे) व हडस्ती या चार ग्रामपंचायतीचा समावेश करण्यात आला आहे.
. ९१ पळसगाव पंचायत समिती गणात पळसगाव, मानोरा, कवडजई, किन्ही, कोर्टीमक्ता, ईटोली व गिलबीली या सात ग्रामपंचायतीचा समावेश आहे. ९२ कोठारी पंचायत समिती गणात कोठारी, काटवली (बामणी), आमडी, कळमना व लावारी या पाच ग्रामपंचायत समाविष्ट केल्या गेल्या आहेत.
बल्लारपूर पंचायत समितीवर केवळ एकदाच कांग्रेसची सत्ता बल्लारपूर तालुका अस्तित्वात आल्यावर १४ मार्च २00२ मध्ये पहिल्यांदा सभापती होण्याचा मान शिवसेनेच्या वैजयंती सोनटक्के यांना मिळाला होता. त्यांचे नंतर या पंचायत समिती मध्ये सहा सभापती झाले.येथे कांग्रेसचे सभापती म्हणून ॲड.हरिश गेडाम यांनी १४ मार्च २0१२ ते १४ सप्टेंबर २०१४ दरम्यान कार्यकाळ सांभाळला. या दोन सभापती चा कार्यकाळ सोडला तर, अन्य सभापती भाजपचे झाले. यामध्ये कवडजई येथील शालिकराम पेंदराम,पळसगाव येथील राजू बुद्धलवार, ईटोली येथील चंद्रकला बोबाटे, नांदगाव (पोडे) येथील गोविंदा पांडुरंग पोडे व मानोरा येथील इंदिरा रमेश पिपरे यांनी भाजपाचे सभापती म्हणून कार्यकाळ पार पाडला आहे. आजतागायत बल्लारपूर पंचायत समितीवर भाजपाचे वर्चस्व असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे इंदिरा पिपरे या सभापती व उपसभापती होण्याचा मान मिळवणारी पहिली महिला ठरली आहे.


