Home चंद्रपुर जिल्हा विशेष भद्रावती नगर परिषद क्षेत्रातील पिंडोनी तलाव जवळील शिवाजी वॉर्ड झाला जलमय

भद्रावती नगर परिषद क्षेत्रातील पिंडोनी तलाव जवळील शिवाजी वॉर्ड झाला जलमय

639

रोज मरे त्याला कोण रडे… पुनर्वसित कुनाडा वासियांचे रडगाणे कायम

वेकोली च्या दुर्लक्षित धोरणाचा पुनर्वसित कुनाडा वासियांना फटका

भद्रावती : सोमवारी दिनांक १ सप्टेंबर रोजी रात्रीला कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे भद्रावती तालुक्यासह, पुनर्वसित कुनाडा गाव व शहरातील डोलारा तलाव, पिंडोनी तलाव परिसरात सर्वत्र पाणीच पाणी साचल्याने व घराघरात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले.

.     कुनाडा गावाला तर चक्क सरोवराचे रूप प्राप्त झाल्याने घरातील अन्न धान्य, जनावरांचा चाऱ्याचे प्रचंड नुकसान झाले. तसेच देऊरवाडा परिसरातील शिरणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने परिसरातील शेत पिकांचे नुकसान झाले . यामुळे शेतकऱ्यांसमोर संकट उभे ठाकले.

.    वेकोली माजरीच्या प्रचंड मातीचे ढिगारे व भद्रावती नगर परिषदेचे पावसाळ्यापूर्वी केलेले ढिसाळ नियोजन याला जबाबदार असल्याची ओरड नागरिकांना तर्फे करण्यात येत आहे. डोलारा प्रभाग व शिवाजी नगर परिसरात भाजपचे शहर अध्यक्ष सुनील नामोजवार यांनी रात्री दीड वाजता मदती करिता धाव घेत संवेदनशीलता दर्शविली. स्थानिक प्रशासना विरोधात प्रचंड असंतोष असल्याची उर्दीघ्न प्रतिक्रिया लोक व्यक्त करीत होते.

error: Content is protected !!