वर्धा नदीच्या प्रकोपाने शेतकऱ्यांचा आक्रोश
कर्जमाफी करण्याची आग्रही मागणी
बल्लारपूर : तालुक्यात जून,जुलै महिन्यात समाधान करणारा पाऊस झाला. यामुळे शेतशिवार हिरवेगार झाले. शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन, तूर, भात व अन्य खरीप पिक बहरले. यावर्षी निसर्ग सात देणार म्हणून शेतकऱ्यांना समाधान वाटत होते. मात्र हे समाधान अल्पजीवी ठरले. वर्धा नदी कोपली. तिच्या पुरामुळे शेकडो एकरात पाणी आले. पिकांची नासाडी झाली. यामुळे शेतकऱ्यांवर आक्रोश करण्याची वेळ आली. आता सरकारने तात्काळ शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
. बल्लारपूर तालुक्यात सर्वाधिक शेतशिवार वर्धा नदीच्या आसपास आहे. कोरडवाहू कृषी क्षेत्र निसर्गाच्या जलचक्रावर अवलंबून आहे.अशातच वर्धा नदीच्या पुराने शेतकऱ्यांची दैना अवस्था केली आहे. नदी सखल भागात शेकडो एकरात पुराचे पाणी आले आहे. यामुळे पिकांची नासाडी झाली आहे. याचा फटका चारवट, हडस्ती, नांदगाव, विसापूर, बल्लारपूर, बामणी, दहेली आदी भागातील शेतकऱ्यांना अधिक बसला आहे.
” वर्धा नदीच्या पुराने गावालगतची शेती गिळकृंत केली.सुपीक जमीन खरडून गेली.आम्हाला शेती परवडत नाही. पण उपाय नाही. शेतकऱ्यांची दैना आहे. शेत जमीन उरली नाही. भाड्याने शेती करावे लागते. पिक हाताशी येत नाही. परिणामी कर्ज काढून शेती करावी लागते. मारोती वाढई, पिडीत शेतकरी हडस्ती “
” पुराने आमच्या उपजिविकेचा प्रश्न गंभीर केला आहे. मेहनतीच्या बळावर शेत हिरवेगार झाले. पण पुराने डोळ्यादेखत सगळे वाहून गेले. आमचा भविष्याचा आधार गेला. कर्जबाजारी शेतकऱ्यांनी जगावे कसे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. आतातरी सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी. प्रशांत अटकारे, हतबल शेतकरी. “


