Home चंद्रपुर जिल्हा विशेष युवतीचे अश्लील व्हीडीओ इंस्टाग्राम वर पोस्ट करणाऱ्या युवकाविरूध्द गुन्हा दाखल

युवतीचे अश्लील व्हीडीओ इंस्टाग्राम वर पोस्ट करणाऱ्या युवकाविरूध्द गुन्हा दाखल

701

@ बलात्कार, अँट्रोसीटी सह विविध गुन्हे दाखल

चिमूर : मागील तिन वर्षांपासुन युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यासह बळजबरीने शारीरीक संबंध प्रस्थापित करून युवतीचे अश्लील व्हिडीओ बनवून इंस्टाग्राम वर अपलोड करनाऱ्या आरोपीला पिडीत मुलीच्या फिर्यादीवरुन भिसी पोलीसांनी अटक केली.

.        भिसी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या वाठोना येथील राकेश कैलास चौधरी (२२) याचे गावातिलच एका १९ वर्षीय युवतीशी सुत जुळले. मागील तिन वर्षांपासुन त्या दोघांमध्ये सुरू असलेल्या प्रेम प्रकरणामुळे अनेकदा शारीरीक संबंध प्रस्तापीत झाले. दरम्यान आरोपी युवकाने पिडीत युवतीला न सांगता तिचे अनेक अश्लील व्हीडीओ बनविले. नंतर अनेकदा अश्लील व्हीडीओ चा धाक दाखवून युवतीशी बळजबरीने शारीरीक संबंध प्रस्थापित केले. दिनांक ९ ऑगस्ट ला आरोपीने युवतीचे अश्लील व्हीडीओ इंस्टाग्राम वर अपलोड करून युवतीची बदनामी केली. सदर बाब युवतीच्या लक्षात येताच युवतीने आपल्या पालकांना सोबत घेऊन आरोपी राकेश विरुध्द भिसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. भिसी चे ठाणेदार मंगेश भोंगाडे, सह.उपनिरीक्षक रविन्द्र वाघ व सह. उपनिरीक्षक थिटे यांनी घटनेचे गांभिर्य लक्षात घेता लगेच वाढोना गावातून आरोपीला अटक केली.

.      भिसी पोलीसांनी आरोपी विरूध्द 64 , 64(2), (M)BNS, R/W 3(1)(W)(i)(ii), 3(2)(va), R/W 66 (E), 67(A) बलात्कार, अँट्रोसीटी सह विवीध कलमाअंतर्गत अपराध नोंदवीला. सदर अपराधाचे पुुढील तपास ब्रम्हपुरी चे उपविभागीय अधीकारी राकेश जाधव करीत आहेत.

error: Content is protected !!