Home चंद्रपुर जिल्हा विशेष विज कोसळून बैलजोडी ठार

विज कोसळून बैलजोडी ठार

723

खरीप हंगामात शेतकऱ्यावर संकट

बल्लारपूर तालुक्यातील हडस्ती येथील घटना

बल्लारपूर : तालुक्यातील हडस्ती शेतशिवारात आज गुरूवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास मेघ गर्जनेसह पाऊस झाला. विजेचा कडकडाटासह पावसात विज कोसळून हडस्ती येथील शेतकरी सुनील नामदेव खोके यांची बैलजोडी ठार झाल्याची घटना घडली. यामुळे ऐन खरीपाच्या हंगामात शेतकऱ्यावर संकट ओढावले आहे.

.        बल्लारपूर तालुक्यातील शेतकरी सुनील खोके नेहमी प्रमाणे शेतशिवारात काम करत होते. दरम्यान दुपारी २ वाजताच्या सुमारास आकाशात काळेकुट्ट ढग जमा झाले. काही कळायच्या अगोदर मेघ गर्जनेसह पाऊस सुरु झाला. नेमक्या त्याचवेळी शेतशिवारात असलेल्या बैलजोडीवर विज कोसळली. या घटनेत दोन बैल जागीच ठार झाले. ऐन शेतीच्या हंगामात बैलजोडी ठार झाल्याने शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट ओढावले आहे. शासनाने पिडीत शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

error: Content is protected !!