Home चंद्रपुर जिल्हा विशेष बल्लारपूर तालुक्यात नव्याने काढणार सरपंच पदाचे आरक्षण

बल्लारपूर तालुक्यात नव्याने काढणार सरपंच पदाचे आरक्षण

785

तहसील कार्यालयात ८ जुलै रोजी निघणार आरक्षण सोडत

जिल्हा निवडणूक विभागाचा आदेश

बल्लारपूर : जिल्हा निवडणूक विभागाने सन 2024 ते 2030 या पाच वर्षाच्या कालावधीसाठी 23 एप्रिल 2025 रोजी बल्लारपूर तालुक्यातील एकूण 17 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर केले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने 6 मे 2025 रोजी पारित केलेल्या आदेशान्वये ग्राम विकास विभागाने शासन निर्णय काढून १५ जुलै २0२५ पूर्वी सरपंच पदांची सोडत काढण्याचे निर्देश दिले.त्यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी ८ जुलै २0२५ रोजी बल्लारपूर तालुक्यात नव्याने सरपंच पदाचे आरक्षण सोडत काढण्यासाठी तहसिलदार यांना सुचित केले आहे.

.     बल्लारपूर तालुक्यात एकूण १७ ग्रामपंचायत आहे. यासाठी 23 एप्रिल 2025 रोजी सरपंच पदाचे आरक्षण अनुसूचित जाती (एस.सी.) प्रवर्गासाठी 3, अनुसूचित जमाती (एसटी) साठी 4, नागरिकांच्या मागास प्रवर्ग (ओबीसी) साठी केवळ 2, तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी 8 असे आरक्षण सोडत जाहीर केली होती. आता यामध्ये बदल होऊन नवीन सरपंच पदाचे आरक्षण अनुसूचित जाती अनुसूचित जाती 3, अनुसूचित जमाती 4, नागरिकांच्या मागास प्रवर्ग (ओबीसी) 5, तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी 5 असे आरक्षण सोडत काढली जाणार आहे. यासाठी जिल्हा निवडणूक विभागाने बल्लारपूर तहसिलदार यांना येत्या ८ जुलै २0२५ रोजी सरपंच पदाचे आरक्षण सोडत काढण्याचे निर्देश दिले आहे.

.    यापूर्वी विसापूर येथे नामाप्र सर्वसाधारण (ओबीसी), बामणी (दुधोली) नामाप्र महिला, गिलबीली व दहेली येथील अनुसूचित जाती महिला, इटोली चक अनुसूचित जाती सर्वसाधारण, मनोरा व लावारी अनुसूचित जमाती सर्वसाधारण, हडस्ती व आमडी अनुसूचित जमाती महिला, नांदगाव (पोडे), पळसगाव, किन्ही, कोठारी सर्वसाधारण, तर काटवली (बामणी), कवडजई व कोर्टीमक्ता सर्वसाधारण महिला असे १७ ग्रामपंचायत मध्ये आरक्षण सोडत काढली होती. आता नव्याने होणाऱ्या आरक्षण सोडतीमध्ये बदल होणार आहे. यामुळे सरपंच पदासाठी मोर्चेबांधणी करणाऱ्यांचा हिरमोड झाला आहे.

जिल्ह्यातील तालुकानिहाय ग्रामपंचायत व आरक्षण तक्ता
तालुका – एकूण ग्रापं – अनु.जाती – अनु जमाती – नामाप्र – सर्वसाधारण
1) बल्लारपूर -१७ – 3 – 4 – 5 – 5
2) चंद्रपूर – 47 – 10 – 7 – 13 -17
3) मूल – 49 -6 -8 – 13 – 22
4) गोंडपिपरी – 50 – 9 – 8 – 13 – 20
5) ब्रम्हपुरी – 75 – 11 – 6 – 20 – 38
6) नागभीड – 56 – 7 – 11 – 15 – 7
7) सिंदेवाही – 50 – 6 – 16 – 13 – 15
8) पोंभुर्णा – 31 – 3 – 9 – 8 – 11
9) भद्रावती – 69 – 9 – 16 – 18- 26
10) जिवती – 36 – 3 – 1 – 3 – 3
11) चिमूर – 92 – 16 – 33 – 25 – 18
12) वरोरा – 81 – 6 – 20 – 22 – 33
13) सावली – 54 – 6 – 8 – 15 – 25
14) राजुरा – 65 – 7 – 4 – 9 – 13
15) कोरपना – 52 – 3 – 5 – 8 – 12
एकूण ग्राम पंचायत – 824 – 105 – 156 – 200 – 281

error: Content is protected !!