Home सामाजिक भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ ब्रह्मपुरीत तिरंगा यात्रा

भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ ब्रह्मपुरीत तिरंगा यात्रा

856

ब्रह्मपुरी : भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल सेनेचे अभिनंदन व त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी समस्त देशभक्त ब्रह्मपुरीकरांच्या वतीने ब्रह्मपुरी येथे भव्य तिरंगा यात्रा पार पडली. यावेळी हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

.      शहरातील मुख्य चौक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात ब्रह्मपुरीमधील सेवानिवृत्त सैनिकांचा सत्कार करत यात्रेला प्रारंभ झाला. येथील ख्रिस्तानंद चौक – झांशी राणी चौक – संत रविदास चौक – फाशी चौक – बाजार चौक – स्वातंत्र्यवीर सावरकर चौक या मार्गे ही भव्य दिव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली. आयोजकांच्या वतीने ५०० फूट लांब तिरंगा ध्वज तयार करण्यात आला होता. सहभागी देशभक्त नागरिकांनी या ध्वजाला पकडून यात्रेत सहभागी झाले. या यात्रेमध्ये ब्राह्मोस मिसाईल ची प्रतिकृती जनतेसाठी विशेष आकर्षण होती. सोबतच यात्रेमधे पी.आर.डी स्पोर्ट्स क्लब च्या वतीने ऑपरेशन सिंदूर मधील महिला प्रमुख विंग कमांडर वॉमिक सिंह आणि कर्नल सोफिया कुरेशी यांची भूमिका साकारणारी झाकी तयार करण्यात आलेली होती.

.     यात्रेमध्ये देशभक्तीच्या गीतावर ब्रह्मपुरीकर देशभक्त देशभक्तीत रंगून गेले होते. भारत माता की जय, वंदे मातरम या घोषणांनी ब्रह्मपुरी दुमदुमून गेली होती. यात्रेच्या सुरवातीला ब्रह्मपुरी विधानसभेचे माजी आमदार प्रा. अतुल देशकर व निवृत सेना अधिकारी अरविंद खोकले यांनी उपस्थित देशभक्तांपुढे आपले विचार मांडले. या तिरंगा यात्रेचा समारोप भारत मातेच्या आरतीने झाला. या तिरंगा यात्रेमध्ये ब्रह्मपुरी शहरातील विविध राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी व विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. सोबतच शहरातील निवृत्त सैनिक सुद्धा यात उत्साहाने सहभागी झाले.

error: Content is protected !!