आ. बंटी भांगडिया यांनी स्वखर्चातून केली जनरेटरची सोय
नागभीड : 1999 साली तपाळ ही पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. मात्र सध्या काळात ही योजना पाणी पुरवठा करण्यास असमर्थ ठरत असल्याने नागभीड नगर परिषद क्षेत्रातील गावांना योग्य प्रमाणात पाणी मिळावे यासाठी चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया यांनी नगरोत्थान योजनेतून 38 कोटी रुपयांची अतिशय महत्वाकांशी अशी घोडाझरी पाणी पुरवठा योजना मंजूर केली. त्यांचे बांधकाम सुद्धा पूर्ण झालेले आहे. एकूण नऊ ठिकाणी पाण्याच्या टाकी बांधण्यात आलेल्या आहेत.
. सात हजार नळ जोडणी पैकी सहा हजार नळ जोडणी करण्यात आलेले आहेत. अजून एक हजार नळ जोडणीचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. सदर पाणी पुरवठा योजनेचे ट्रायल झालेले असून नागभीड न. प. क्षेत्रात शुद्ध पाणी मिळणे सुरु झाले आहे. मात्र या योजनेच्या माध्यमातून पाणी पुरवठा करताना पाहिजे त्या प्रमाणात विदयुत दाब मिळत नसल्याने मोटार पंप या वारंवार बंद पडत असल्याने या योजनेच्या माध्यमातून पाणी पुरवठा फार कमी प्रमाणात होत होता. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण झाली होती. ही समस्या लक्षात घेता भारतीय जनता पार्टी च्या कार्यकर्त्यांनी आमदार भांगडिया यांच्या कडे या संदर्भात पाठपुरावा करून पाणी प्रश्न सोडविण्याची मागणी केली होती.
. त्यानुसार आमदार भांगडिया यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे अधिकारी, नागभीड नगर परिषदेचे अधिकारी, ठेकेदार,यांची या प्रश्नावर नागपूर येथे अधीक्षक अभियंता कार्यालयात संयुक्त बैठक घेतली. व योग्य त्या सूचना देत 24 तास विद्युत पुरवठा करण्याच्या सूचना दिल्या तसेच तो पर्यंत ही पाण्याच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी स्वखर्चातून 365 के. व्ही. ए. क्षमतेचा जनरेटर उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. त्यानुसार काल घोडाझरी येथे पाणी पुरवठा योजनेच्या ठिकाणी सदर जनरेटर उपलब्ध झालेले असून सुरु करण्यात आलेले आहे.यामुळे आता नागभीड नगरपरिषद क्षेत्रात मुबलक पाणी मिळणार आहे. त्यामुळे आता ही भिषण पाणी समस्या सुटणार आहे. उर्वरित नळ कनेक्शन सुद्धा लवकरात लवकर जोडले जाणार आहेत. त्यामुळे जनतेने आमदार बंटी भांगडिया यांचे आभार व्यक्त केले आहे.


