Home चंद्रपुर जिल्हा विशेष त्या नरभक्षक वाघाचा त्वरित बंदोबस्त करा

त्या नरभक्षक वाघाचा त्वरित बंदोबस्त करा

861

वनपरिक्षेत्र अधिकारी तळोधी यांना गावकऱ्याचे निवेदन

नागभीड : तालुक्यातील येथून गंगासागर हेटी येथे मागील महिन्यात दिनांक 15 मे रोजी मारुती सखाराम बोरकर हे मोह फुल गोळा करण्यासाठी जंगलात गेले असता त्यांच्यावर वाघाने हल्ला करून ठार केले तसेच दिनांक 18 ला वाढोणा येते तेंदू पत्ता संकलन करण्यासाठी गेलेल्या मारुती शेंडे यांना वाघाने यांना ठार केले आहे.

.       आता शेताचे कामे चालू झालेली आहेत आणि बहुतांश लोकांची शेती ही जंगलाला लागून असल्यामुळे त्यांना जंगल व्याप्त रस्त्यामधून येणे जाणे करावे लागते त्यामुळे जो नरभक्षक वाघ आहे. तो शेतकऱ्याला नेहमी दिसत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना कधी धोका होईल सांगता येत नाही. त्यामुळे नरभक्षक वाघाचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी वनपरिक्षेत्र अधिकारी तळोधी बा यांना निवेदन देताना पोलिस पाटील राजेंद्र सडमाके, माजी उपसरपंच शुद्धोधन बारसागडे, साईनाथ डोंगरवार, प्रकाश बोरकर, राकेश डोंगरवार, तसेच ग्रामवासी यांनी निवेदन देऊन केली आहे.

error: Content is protected !!