आरोग्य अधिकाऱ्यासंह कर्मचारी गायब ?
आरोग्य केंद्र रामभरोसे
वरोरा : वर्धा जिल्ह्याची शेवटची सिमा असलेल्या वरोरा तालुक्यातील कोसरसार प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य अधिकाऱ्यासंह कर्मचारी गायब असल्याचा व्हिडीओ सामाजिक माध्यमावर फिरत असून त्या व्हिडीओ मध्ये ज्या पद्धतीने दिवसाढवळ्या एकही आरोग्य अधिकारी किंवा कर्मचारी हजर नसल्याचे दिसत आहें या प्रकारामुळे आरोग्यसेवेचे धिंडवडे निघालेते आहे
. वरोरा तालुक्यातील कोसरसार येथे डॉक्टर, आरोग्य सेविका, आरोग्य सेवकअसा बराच कर्मचारी वर्ग असताना मात्र प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार रामभरोसे सुरू आहे. कोसरसार प्राथमिक आरोग्य केंद्रात परिसरातील अनेक गावांतून दुरदुरून रुग्ण येत असतात. मात्र आरोग्य केंद्रात एकही अधिकारी व कर्मचारी रुग्णालयात उपस्थित नसून अख्ख आरोग्य केंद्रच रामभरोसे असल्याचे एका वायरल व्हिडिओ वरून समोर आले आहे.
. एकीकडे शासनाचा कोट्यावधी रुपयांचा खर्च आरोग्य व्यवस्थेवर होतं असतांना आरोग्य अधिकारी व कर्मचारी जनतेच्या आरोग्या बाबत गंभीर दिसत नाही. आरोग्य केंद्रच वाऱ्यावर सोडून स्वतःच्या मर्जीने वाट्टेल ते करत असतील तर त्या आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी या सर्वांवर कारवाई होणे आवश्यक आहे, या परिसरातील हजारो गोरगरीब जनतेच्या आरोग्याची काळजी व्हावी व त्यांना प्राथमिक उपचार मिळावा यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करून प्राथमिक आरोग्य केंद्र उभारलं पण ते प्राथमिक आरोग्य केंद्रच योग्य उपचाराअभावी आजारी असेल तर मग इथे येणाऱ्या गोरगरीब रुग्णांचे काय? असा प्रश्न उपस्थित होतं असून या संदर्भात लगेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी होतं आहे.