वीज पडून बैल ठार
शेतकरी जखमी
घराची पत्रे उडाली
चंद्रपुरात फलक कोसळले
वरोरा : चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस व वादळ वाऱ्यामुळे अनेकांचे नुकसान झाले असून वरोरा तालुक्यात वीज पडून बैल ठार झाला तर शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना वरोरा तालुक्यातील मांडवघोराड येथे शुक्रवारी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास घडली.
![]()
. शुक्रवारी दिवसभर उन्हाचा तडाखा होता. आणि सायंकाळी वातावरणात बदल घडत अवकाळी पाऊस व जोरात वादळ सुरु झाला. यात चंद्रपूरातीलं गांधी चौकातील लोखंडी फलक कोसळला मात्र सुदैवाने कोणतीही दुर्घटना झाली नाही. काही प्रभागात वीज पुरवठा ठप्प झाला होता त्यामुळे नागरिकांत तारांबळ उडाली होती. तर वरोरा तालुक्यातील आल्फर सातारा येथे सायकाळी 7 वाजताच्या दरम्यान आलेल्या वाराधुनीत मनोहर लक्ष्मण मेश्राम यांच्या घराचे पत्रे उडून गेले तर सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान विजासह जोराचा पाऊस पडला त्यात विनोद मोतीराम वैद्य रा. मांडवघोराड हे शेतातून परत येत असताना त्यांच्या एक बैलावर वीज पडली. यात बैलाचा मृत्यू झाला. व शेतकऱ्याच्या हाताला इजा होऊन जखमी झाले.


