चौकीदार, सीसीटीव्ही तसेच पोलीस गस्त वाढवावी
प्रवीण चिमुरकर यांची मागणी
भद्रावती : शहरातील हुतात्मा स्मारक शहराचा इतिहास सांगत कित्येक दशक अगदी ताठ मानेन उभा आहे. हुतात्मा स्मारक हे स्वातंत्र्यासाठी स्वतः च्या प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्मा लक्ष्मण जगन्नाथ भोज यांच्या आठवणीत बांधले आहे.
. परंतु शहरातील काही नशेडी, टवाळखोर तरूणांमुळे आता हुतात्मा स्मारकाची गरिमा राहीलेली दिसत नाही. रोज सायंकाळी काही तरूण सिगारेट, गांज्या ओढतांना दिसतात. गांजा आणि सिगारेट हुतात्मा स्मारकाच्याच परिसरात लपवून ठेवतात. ऐवढेच नाही तर काही तरूण जोडपे अनेकदा अश्लील चाळे करताना दिसल्याचे तेथील येणारे नागरिक सांगतात. काही टवाळखोर तर चक्क आतमध्ये बाईक स्टंट करतात. हुतात्मा स्मारकाच्या देखरेखीसाठी कोणताही चौकीदार नाही. इथले सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहे. त्यामुळे स्मारकाच्या परिसरात अशा घटना होत आहे. याकडे नगरपरिषदेचे लक्ष नसून भद्रावतीची ऐतिहासिक संपत्तीची गरिमा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
. हुतात्मा स्मारकाच्या बाजुला बगीचा असून लागूणच अभ्यासिका आहेत. इथे लहान मुलांचे शिबीर, स्केटिंग कोचिंग, पतंजली योगा तर भविष्यात काही मोठं करायचे स्वप्न बाळगून अभ्यास करणारे विद्यार्थी येत असतात. परंतु हेच ठिकाणी रात्री नशेडींचा अड्डा बनतो. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देऊन हुतात्मा स्मारकासाठी चौकीदार नेमावा, सर्व सीसीटीव्ही कॅमेरे पुर्ववत चालू करावे, गेटच्या आता कोणालाही दुचाकी आणण्याची परवानगी देऊ नये, बंद असलेले सर्व लाईट चालू करावे तसेच पोलीस प्रशासनाने सायंकाळी ५ ते रात्री १० पर्यंत गस्त वाढवावी. अशा मागणीचे पत्र जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद, चंद्रपूर चे सदस्य प्रवीण चिमुरकर यांनी मुख्याधिकारी नगर परिषद तसेच ठाणेदार भद्रावती यांना देण्यात आले आहे.
हुतात्मा स्मारकासंबंधी अनेक तक्रारी येत असुन लवकरात लवकर टेंडर काढून चौकीदाराची नियुक्ती केली जाईल. विशाखा शेळकी, मुख्याधिकारी, नगरपरिषद, भद्रावती.