Home सामाजिक परसोडा येथे रक्तगट व रक्त तपासणी शिबिराचे आयोजन

परसोडा येथे रक्तगट व रक्त तपासणी शिबिराचे आयोजन

873

वरोरा : येथील सामाजिक कार्यकर्ते तथा आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा चे कर्मचारी प्रमोद नागापूरे यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय, वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तगट व विविध रक्त तपासणी शिबिराचे आयोजन गुरुवारी, दिनांक १५ मे २०२५ रोजी सकाळी ८ वाजता गुरुदेव सेवा मंडळ सभागृह, परसोडा येथे आयोजित करण्यात आले आहे.

.     या शिबिरा दरम्यान रक्तगट तपासणीसह सीबीसी, लिव्हर फंक्शन टेस्ट, किडनी फंक्शन, थायरॉईड तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी, सिकलसेल तपासणी आणि एपीएलसी तपासणी अशा अनेक अत्यावश्यक तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत.

.    विशेष म्हणजे, शिबिरादरम्यान ‘आयुष्मान भारत’ योजनेअंतर्गत आरोग्य कार्ड काढून मिळणार आहे. यासाठी आधारकार्ड व रेशन कार्ड सोबत आणणे बंधनकारक आहे. ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती निर्माण व्हावी आणि गरजू नागरिकांना वेळेवर तपासणी व उपचार मिळावेत, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. समाजसेवेची निस्वार्थ भावना ठेवून प्रमोद नागापूरेंनी घेतलेला पुढाकार परिसरात कौतुकाचा विषय ठरत आहे.

error: Content is protected !!