Home सामाजिक आज जिवतीत खा. धानोरकर यांचा जनता दरबार

आज जिवतीत खा. धानोरकर यांचा जनता दरबार

868

विविध विभागातील अधिकाऱ्यांसह आढावा बैठक

नागरिकांच्या समस्यांवर करणार चर्चा

चंद्रपूर : शेवटच्या टोकावर असलेल्या जिवती तालुक्यातील नागरिकांच्या समस्या व अडचणी जाणून घेऊन त्यांचे त्वरित निराकरण करण्याच्या उद्देशाने खासदार प्रतिभा धानोरकर आज (दि. 14) बुधवारी पंचायत समिती जिवती येथे सकाळी 11 वाजता जनता दरबार घेत विविध विभागातील अधिकाऱ्यांसह आढावा बैठक घेणार आहे.

.       जिवती तालुक्यातील नागरिकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, ज्यामध्ये प्रामुख्याने खराब रस्ते, वनहक्कांसंबंधी समस्या, अनियमित वीजपुरवठा आणि अपुऱ्या आरोग्य सेवा यांचा समावेश आहे. या समस्यांमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर, खासदार प्रतिभा धानोरकर यांनी नागरिकांच्या समस्या थेट ऐकून घेण्यासाठी आणि त्यावर तातडीने तोडगा काढण्यासाठी या जनता दरबाराचे आयोजन केले आहे.

.       या जनता दरबारात खासदार प्रतिभा धानोरकर स्वतः नागरिकांशी संवाद साधणार आहेत. नागरिकांना त्यांच्या समस्या व अडचणी थेट मांडण्याची संधी मिळणार आहे. नागरिकांच्या समस्यांची नोंद घेऊन संबंधित शासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देणार आहेत.

.       या जनता दरबाराच्या आयोजनामागील मुख्य उद्देश हा जिवती तालुक्यातील नागरिकांना त्यांच्या समस्यांसाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि प्रशासनाकडून त्यांच्या समस्यांचे लवकरात लवकर निराकरण करणे हा आहे. खासदार धानोरकर यांनी यापूर्वीही नागरिकांच्या समस्यांसाठी वेळोवेळी प्रयत्न केले आहेत आणि हा जनता दरबार त्याच प्रयत्नांचा एक भाग आहे. जिवती तालुक्यातील ज्यांना आपल्या समस्या व अडचणी खासदार महोदयांपर्यंत पोहोचवायच्या आहेत, त्यांनी आज सकाळी ११ वाजता पंचायत समिती जिवती येथे लेखी निवेदनासह भ्रमणध्वनी क्रमांक नोंद करून उपस्थित राहावे. असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!