Home शैक्षणिक जिल्ह्यात प्रथम आलेल्या ऋतुजाचा ढिवर भोई समाज संघटनाच्या वतीने सत्कार

जिल्ह्यात प्रथम आलेल्या ऋतुजाचा ढिवर भोई समाज संघटनाच्या वतीने सत्कार

1088

नागभीड : येथील कर्मवीर विद्यालायची विद्यार्थिनी ऋतुजा वेलथरे ही इयत्ता 12 च्या परीक्षेत कला शाखेतून 89% घेत जिल्ह्यात प्रथम आली. ऋतुजा चे आई वडील हे मोल मजुरी चे काम करतात अश्या घरची परिस्थिती सुद्धा बेताची अश्या परिस्थिती मध्ये हे यश संपादन केल्याने हा प्रसंग ढिवर समाजासाठी ही बाब भूषणावह असून तिच्या पुढील शिक्षणासाठी तिला आर्थिक स्वरूपात मदत करण्यात आली. व तिच्या आई वडिलांचा, तिच्या सर्व शिक्षकांचा यावेळी आभार व्यक्त करण्यात आला.

.         यावेळी नागभीड तालुका ढिवर भोई समाज संघटना नागभीड चे अध्यक्ष गुलाबराव भानारकर, कार्याध्यक्ष नागोराव नान्हे, सचिव गिरीश नगरे, माजी प्राचार्य नीलकंठ चांदेकर, शिंदे, माजी विस्तार अधिकारी नागो भानारकर, होमदेव नान्हे, पराग भानारकर यांची उपस्थिती होती.

error: Content is protected !!