3 दुचाकी हस्तगत
2 आरोपीना अटक
चंद्रपुर : मागील काही दिवसापासून दुचाकी चोरीचा धुमाकूळ घालणाऱ्या दोन अट्टल चोरट्याना रामनगर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 3 दुचाकी वाहन हस्तगत करण्यात आल्या असून दोन्ही आरोपीना रामनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे, विशाल नानाजी लेडांगे (39)राहणार जगन्नाथ बाबा नगर, चंद्रपूर व विनोद पात्रुजी शेंडे (42) राहणार मित्र नगर चंद्रपूर असे आरोपीचे नाव आहे. दोन्ही आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.
. मागील काही दिवसांपासून चोरी होत असलेल्या दुचाकी वाहनांच्या प्रकरणाचा छडा लावण्यात यावा असे निर्देश पोलीस अधीक्षकांनी दिले होते. त्यानुसार रामनगर पोलिसांचे पथक याबाबत तपास करीत असताना सराईत दोन आरोपीना अटक करण्यात आली. आरोपींनी मूल व चंद्रपुरात दुचाकी चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे, हे दोन्ही आरोपी मागील काही महिन्यापासून पोलिसांना चकमा देत होते, मात्र पोलिसांनी आरोपीच्या सतत मागावर राहून त्यांचा ठावठिकाणा शोधत त्यांना अटक केली.
. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनात रामनगर पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक देवाजी नरोटे, हनुमान उगले, पोलीस कर्मचारी मनीषा मोरे, आनंद खरात, जितेंद्र आकरे, लालू यादव, पेतरस सिडाम, प्रशांत शेंद्रे, शरद कुडे, सचिन गुरनुले, रवीकुमार ढेंगळे, संदीप कामडी, हिरा गुप्ता, पंकज ठोंबरे, प्रफुल पुप्पलवार, ब्ल्यूटी साखरे यांनी केली.