भद्रावती : “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात भद्रावती तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोडपेठ या शाळेने तिसरा क्रमांक पटकावीत एक लाख रुपयांच्या पारितोषिकाची मानकरी ठरली.
भद्रावती येथील पंचायत समिती सभागृहामध्ये झालेल्या बक्षिस वितरण कार्यक्रमात गटशिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश महाकाळकर व संवर्ग विकास अधिकारी आशुतोष सपकाळ यांचे हस्ते एक लाख रुपयाचा धनादेश व प्रमाणपत्र शाळेच्या मुख्याध्यापिका नंदा उरकुडे यांना देण्यात आला.
. भद्रावती तालुक्यात नेहमीच उपक्रमासाठी अग्रेसर असलेल्या घोडपेठ शाळेला बक्षिस प्रप्प्त करून देण्यासाठी गटशिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश महाकाळकर, शि.वि. अधिकारी कल्पना सिहामशेट्टीवार, केंद्र-प्रमुख तुमराम नंदा उरकुडे यांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धेसाठी सरपंच अनिल खडके, उपसरपंच प्रदिप्र देवगडे, सदस्य देवा शंखावार, सरोज रामटेके, ग्रामसेवक नगराळे, पोलीस पाटील विजय गेडाम, शा.व्य.स. अध्यक्षा रेशमा विधाते, उपाध्यक्ष गुणवंत परसुटकर, मनिषा भोंगळे यांचे विशेष सहकार्य लाभले.
. या स्पर्धेसाठी डॉ. वैशाली वडेट्टीवार, नेत्त्रप्रभा रहाटे, भाग्यश्री कराम, सुजाला खडके, वंदना लोडे, अर्चना रासेकर, माणिक सिडाम, चंद्रशेखर वर्मा, समीर देवगडे, नरेंद्र चापळे, भाग्यश्री आसुरकर, दिवाकर आसुटकर, कोतवाल रामटेके, मंगला भोयर, मंगला चापले, मंजु लाये, कल्पना पिंपळशेंडे, सुरज चिकणकर, रवि माणुसमारे, केंद्रालील अरविंद चावरे, आकाश जक्कुळवार, काळे, मोडक, उज्ज्वला खिरटकर, पाम्पट्टीवार, झाडे इत्यादींचे विशेष सहकार्य मिळाले.


